आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:13 AM2019-02-13T00:13:20+5:302019-02-13T00:15:48+5:30

महामानव, प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी आंदोलनासाठी निष्ठावान राहणाऱ्या जुन्या आणि तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा येथे घेण्यात आला.

Honor of Ambedkarite workers | आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा

आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा

Next
ठळक मुद्दे१३५ जणांना सन्मानपत्र : चळवळीतील पहिली पिढी, योगदानाचे भरभरून केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महामानव, प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी आंदोलनासाठी निष्ठावान राहणाऱ्या जुन्या आणि तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा येथे घेण्यात आला. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा आंबेडकरी कार्यकर्ता सन्मान समितीच्यावतीने स्थानिक मेडिकल चौकातील बचत भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १३५ कार्यकर्त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र तथा ग्रंथ आणि मानधन देऊन यथोचित सन्मान करण्यात आला .
आंबेडकरी चळवळीत बाबासाहेबांच्या सोबत व त्यांच्या महापरिनिवार्णानंतर झालेल्या आंदोलनात ज्यांनी स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष न देता समाजासाठी खस्ता खाल्ल्या अशा निष्ठावान कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान व्हावा आणि वर्तमानातील कार्यकर्तृत्वाचा वसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटक ज्येष्ठ रिपब्लिकन नेते दिवंगत रा.सु. गवई यांच्या पत्नी प्राचार्य कमलताई गवई होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दलाचे 'कॅप्टन' अशोक खंनाडे होते. डॉ. पुरणचंद्र मेश्राम, कवी ई.मो. नारनवरे, चंदन तेलंग, डॉ. दिलीप घावडे, बाळासाहेब सोनोने, पी.डी. डबले, बापुराव धुळे, संजय मानकर, मोहन भोयर ,महेंद्र मानकर, अविनाश भगत, प्रकाश भस्मे, विजय डांगे, सदाशिवराव भालेराव आदी मान्यवर हजर होते.
रमाबाई आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा घेण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यवतमाळतून गोविंद मेश्राम, जयप्रकाश चव्हाण, सुनील बोरकर, विनोद खोब्रागडे, अ‍ॅड. अमोल गणवीर, विजय पाटील, कमलाबाई गायकवाड, कल्पना मेश्राम, सरस्वती जोगळेकर, लोपामुद्रा महाजन, ईश्वर फुलूके, प्रकाश पाटील, कल्पना बागडे, अमर गायकवाड, मंदा गडपायले यांच्यासह एकूण ३२ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यातआला.
बाभूळगाव तालुक्यातून पी.डी. डबले, उत्तमराव दिघाडे, शंकरराव वानखेडे, रत्नपाल डोफे, धर्मपाल माने यांच्यासह १० कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. दारव्हा तालुक्यातून विमल मुजमुले, सदाशिव परोपटे, देवबाजी खंडारे, अनुसयाबाई गडपायले, अशोक वाकोडे यांच्यासह नऊ लोकांचा सन्मान करण्यात आला. नेर तालुक्यातून रामकृष्ण अघम, महादेवराव घरडे, सुधाकर तायडे, जयकृष्ण बोरकर यांच्यासह इतर आठ लोकांचा सत्कार करण्यात आला.
वणी तालुक्यातून रंजनाताई मोडक, गौतम तेलंग, पुंडलिक साठे, अशोक भगत, जयंत साठे, संजय तेलंग, पांढरकवडा तालुक्यातून बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी तुकाराम जनपदकर गुरुजी यांचा सन्मान त्यांच्या कन्या ताई कांबळे यांनी स्वीकारला. उमरखेड तालुक्यातून दादाराव पाईकराव, सोनबाजी हनवते, प्रेम हनवते, डॉ. अनिल काळपांडे, सज्जन बरडे, बापूरावजी धुळे यांच्यासह इतर १२ लोकांचा तर महागाव आर्णी तालुक्यातून पांडुरंग बरडे, पुरुषोत्तम चोखोबा खंडारे, शरद जाधव, संजय भगत, आर.एम. भालेराव, भीमराव वाघमारे (कळंब) आदी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक प्रा. विलास भवरे यांनी केले. आनंद गायकवाड यांनी भूमिका मांडली. संचालन सुनील वासनिक यांनी केले. ठरावाचे वाचन आयोजन समितीचे संजय बोरकर यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नवनीत महाजन, कवडूजी नगराळे, आनंद धवने, डॉ. सुभाष जमधाडे, सुमेध ठमके, डॉ. साहेबराव कदम, भीमसिंह चव्हाण, अ‍ॅड.धनंजय मानकर, अ‍ॅड. रवींद्र अलोणे, महेंद्र गजभिये, सोमेश्वर जाधव, सुरेश कांबळे, रत्नपाल डोफे, प्रा. डॉ. विश्वजित कांबळे, बंडू गंगावणे, बापुराव रंगारी, राहुल सोनवणे, आनंद डोंगरे, कल्पना चव्हाण, मालती गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Honor of Ambedkarite workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.