कवडीमोल दराने तूर उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:25 PM2018-01-21T23:25:02+5:302018-01-21T23:25:13+5:30

काही वर्षांपूर्वी दहा हजार रुपये क्ंिवटलपर्यंत गेलेल्या तुरीला यंदा कवडीमोल भाव आहे. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी कोंडीत पकडले आहे.

In the grower producer's troubles at the kayamimol rate | कवडीमोल दराने तूर उत्पादक संकटात

कवडीमोल दराने तूर उत्पादक संकटात

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून लूट : शासकीय खरेदी केंद्र बंदच, बाजार समितीत प्रचंड आवक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काही वर्षांपूर्वी दहा हजार रुपये क्ंिवटलपर्यंत गेलेल्या तुरीला यंदा कवडीमोल भाव आहे. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी कोंडीत पकडले आहे. शासनाचे हमी भाव ५४०० रुपये असताना शेतकऱ्यांची तूर मात्र ३५०० ते ४२०० रुपये दराने सरसकट खरेदी केली जात आहे.
यंदा अपुरा पाऊस व बोंडअळीने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. शासनाने मदत घोषित केली, तरी अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. अशा अडचणीच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण आशा तूर पिकावर होती. महिनाभरापासून तूर काढण्याला जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. यंदा एक लाख ८० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली होती. बऱ्यापैकी पीक शेतकऱ्यांच्या हाती आले. तुरीतून आपली आर्थिक तजवीज होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र तुरीचे भाव पाहून शेतकरी पुरता खचला आहे. तुरीला बाजारात व्यापारी केवळ ३५०० ते ४२०० रुपये भाव देत आहे. त्यातही विविध अटी लादल्या जातात. यामुळे लावलागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली आहे. शेतकरी अडचणीत असल्याचे पाहून व्यापारी त्यांची लूट करीत आहे. लिलावाच्या नावाखाली त्यांना अल्प दर दिला जात आहे. दुसरीकडे शासनाने अद्यापही नाफेडमार्फत खरेदी सुरू केली नाही. विशेष म्हणजे गतवर्षी जानेवारी महिन्यातच नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात झाली होती.
यंदा जानेवारी संपत आला तरी शासकीय पातळीवर कुठल्याही हालचाली दिसत नाही. शेतकºयांची संपूर्ण तूर विकल्यानंतर शासकीय खरेदी केंद्र सुरू करणार का, असा सवाल शेतकरी करीत आहे.
सोमवारी तातडीची बैठक
मार्केटिंग फेडरेशनच्या नेतृत्वात यंदा नाफेड तूर खरेदी करणार आहे. त्याकरिता १७ केंद्रांचा प्रस्ताव देण्यात आला. त्या अनुषंगाने वखार महामंडळाने सोमवार, २२ जानेवारीला बैठक बोलावली. शासनाने नाफेडच्या मदतीने तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू केली. आत्तापर्यंत आठ हजार ७०० शेतकºयांनी नोंदणी केली. तूर खरेदीत आर्द्रता मापक यंत्र, पोते, चाळण्या पाठविण्यात आल्या. ग्रेडरची नियुक्ती करण्यात आली. मात्र तूर ठेण्यासाठी वखार महामंडळाकडे जागा नाही. ५४५० रूपये प्रती क्विंटल दराने तूर खरेदी केली जाणार आहे.

तूर खरेदीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. आदेश मिळताच खरेदी सुरू होईल. तत्पूर्वी अडचणी जाणून घेण्यासाठी सोमवारी बैठक बोलावण्यात आली आहे.
- बाळकृष्ण गावंडे
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, यवतमाळ.

Web Title: In the grower producer's troubles at the kayamimol rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.