टाकाऊ वस्तूपासून बनविली पेट्रोलवर चालणारी सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 09:48 PM2018-06-12T21:48:27+5:302018-06-12T21:48:27+5:30

अडगळीत पडलेली सायकल आणि लुनाचे स्पेअरपार्ट जोडजाड करून पेट्रोलवर चालणारी सायकल बनविण्याची किमया कृष्णापूरच्या (ता.पांढरकवडा) शेतकरी पुत्राने साधली आहे.

Gasoline | टाकाऊ वस्तूपासून बनविली पेट्रोलवर चालणारी सायकल

टाकाऊ वस्तूपासून बनविली पेट्रोलवर चालणारी सायकल

Next
ठळक मुद्देजुगाड टेक्नॉलॉजी : कृष्णापूरच्या सुरजने साधली किमया

शेषराव राठोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहदा : अडगळीत पडलेली सायकल आणि लुनाचे स्पेअरपार्ट जोडजाड करून पेट्रोलवर चालणारी सायकल बनविण्याची किमया कृष्णापूरच्या (ता.पांढरकवडा) शेतकरी पुत्राने साधली आहे. सुरज दिलीप वानखडे याने ही सायकल तयार केली असून, प्रती लिटर ५० ते ५५ किलोमीटर अ‍ॅव्हरेज देत असल्याचा दावा त्याने केला आहे.
सुरजला दहावीनंतर मोटर मेकॅनिक व्हायचे होते. परंतु या प्रयत्नात तो यशस्वी झाला नाही. १२ वी पर्यंत शिक्षण झालेले. पण त्याच्यातील यांत्रिक गुण स्वस्थ बसू देत नव्हता. घराच्या आवारात पडून असलेली निकामी सायकल आणि लुनाही त्याला सतत खुणावत होती. जुगाड टेक्नॉलाजीतून सुरजने चक्क पेट्रोलवर धावणारी सायकल उभी केली.
लुनाचे इंजीन व चाक आणि सायकलची फे्रम यासाठी वापरण्यात आली. थोड्याफार तांत्रिक बाजूंची जुळवाजुळव करून पेट्रोलवर चालणारी सायकल अवघ्या काही महिन्यात उभी केली. यासाठी केवळ एक हजार रुपये खर्च आला. या सायकलचे वजन ३० किलो आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ५० ते ५५ किलोमीटर धावते. कुठलेही तांत्रिक शिक्षण न घेता तयार केलेली सायकल पाहून सुरजचे कौतुक केले जात आहे.
‘मेक इन इंडिया’च्या अनुषंगाने सुरजने या सायकलला ‘नमो’ नाव दिले आहे. कमी पैशात चारचाकी बनविण्याचे सुरजचे स्वप्न आहे. अशा गुणवंताला आणखी तांत्रिक ज्ञान मिळाल्यास त्याच्या स्वप्नाला आकार येण्यास वेळ लागणार नाही, एवढे मात्र निश्चित.
 

Web Title: Gasoline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.