दरोड्याच्या प्रयत्नात बीडचे पाच गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:04 PM2017-12-15T22:04:37+5:302017-12-15T22:05:08+5:30

येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी सायंकाळी वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या एका टोळीला अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त केल्याने अन्य काही गुन्ह्यांचा उलगडा होतो का, या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.

Five bogs of bead in the attempt of a robbery | दरोड्याच्या प्रयत्नात बीडचे पाच गजाआड

दरोड्याच्या प्रयत्नात बीडचे पाच गजाआड

Next
ठळक मुद्देघातक शस्त्रे जप्त : वाहन पुण्याचे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी सायंकाळी वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या एका टोळीला अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त केल्याने अन्य काही गुन्ह्यांचा उलगडा होतो का, या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.
सुशील अशोकराव माने (२५) रा. सुरुमगाव ता. माझरगाव जि. बिड ह.मु. मागडेवाडी पुणे, मधुकर संग्राम राठोड रा. रावण कोडा ता. जलकोट जि. लातूर ह.मु. कात्रजमागेवाडी, पुणे, शेख मुकीद शेख कासम (२९) रा. गावराई जि. बिड ह.मु. सय्यदनगर पुणे, गजानन बलभीम माने (२५) रा. सुरुमगाव ता. माझरगाव जि. बीड, अतुल चंद्रभान सवाडे (२६) रा. बोरगाव धांदे ता. धामणगाव रेल्वे जि. अमरावती अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. त्यांच्या ताब्यातून एम.एच.१२/के.एन-३६७४ क्रमांकाची पुणे पासिंगची ओला टॅक्सी जप्त करण्यात आली. या आरोपींच्या वाहनाची झडती घेतली असता देशी पिस्टल, दोन राऊंड, धारदार चाकू, फर्शा, छत्री रॉड, अर्धा किलो मिरची पूड, पेंचीस आदी साहित्य आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता या आरोपींकडून समाधानकारक व खात्री होईल, असे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. शहरात दरोडा घालण्याच्या उद्देशाने ही टोळी फिरत असावी, असा संशय व्यक्त करीत वडगाव रोड पोलिसांनी या आरोपीविरुद्ध शस्त्र प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ व ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविला. या आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ठाणेदार शिवाजी बचाटे अधिक तपास करीत आहे.
गुन्हेगारी टोळीच्या ‘हिशेबा’चा तर हेतू नव्हे?
आम्ही माहूर परिसरात रेती घाट घेतला, तेथे धमक्या मिळतात, त्या अनुषंगाने स्वरक्षणासाठी शस्त्र हवे असून ते यवतमाळात मिळते म्हणून येथे आल्याचे हे आरोपी खासगीत कबूल करीत आहे. परंतु पोलिसांना त्यांच्या या सांगण्यावर विश्वास नाही. बिडचे आरोपी, पुण्यात राहणारे आणि शस्त्रासाठी थेट यवतमाळात आले कसे यावर तपास केंद्रीत करण्यात आला आहे. ज्या भागात या आरोपींचा वावर आढळला ते पाहता गुन्हेगारी टोळ्यांमधील ‘हिशेब’ चुकता करण्यासाठी तर ऐन दिवसावर हे युवक आले नव्हते ना, या बाजूनेही वडगाव रोड पोलीस चाचपणी करीत असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Five bogs of bead in the attempt of a robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा