दिग्रस वीज वितरणचा कामात हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:15 PM2019-06-15T22:15:31+5:302019-06-15T22:16:04+5:30

वाऱ्याची थोडी झुळूक आली, तरी वीज तास न् तास गुल होते. गुरूवारी तर दिवसभर वीज पुरवठा ठप्प होता. सतत ये-जा सुरू होती. यामुळे विजेवर आधारित कामे खोळंबली. परिणामी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली.

Dismal power distribution work | दिग्रस वीज वितरणचा कामात हलगर्जीपणा

दिग्रस वीज वितरणचा कामात हलगर्जीपणा

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । कामे खोळंबली, बिलाची वसुली करता तशी सेवा का नाही? नागरिकांचा सवाल, तारांवर फांद्या

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : वाऱ्याची थोडी झुळूक आली, तरी वीज तास न् तास गुल होते. गुरूवारी तर दिवसभर वीज पुरवठा ठप्प होता. सतत ये-जा सुरू होती. यामुळे विजेवर आधारित कामे खोळंबली. परिणामी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. आता वीज वितरण कंपनीने हलगर्जीपणाचा कळस गाठल्याने त्यांनी संताप तीव्र व्यक्त केला. गुरूवार हा दिग्रसकरांसाठी महत्वाचा दिवस असतो. या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्रामीण जनता शहरात येते. मात्र वीज वितरणचा पुरवठा सतत सुरू-बंद होत असल्याने जनतेची कामेच झाली नाही.
नुकताच दहावी, बारावीचा निकाल लागला. त्यामुळे शहर व खेड्यातील नागरिक पाल्यांच्या पुढील शिक्षणाकरिता लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी येथील प्रशासकीय कार्यालयात येतात. कागदपत्रांसाठी त्यांना आॅनलाईन नोंदणी करावी लागते. मात्र गुरूवारी वीज पुरवठा खंडित असल्याने ही नोंदणी होऊ शकली नाही. परिणामी दूरवरून आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागाला. मुद्रांक नोंदणी कार्यालय, तहसील, इतर कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वच कामे खोळंबली होती.
गेल्या आठवड्यापासून शहरासह तालुक्यात वादळासह मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. या पाऊस आणि वादळाने तालुक्यात मोठे नुकसान झाले. शहर व तालुक्यातील अनेक भागातील वीज पुरवठ्याचे तार तुटले.
खांब उन्मळून पडले. त्यामुळे शहर व तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा ठप्प झाला. मात्र बंद झालेला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीज वितरणने दिग्रसवासीयांना रात्रभर अंधारात ठेवले. अनेक गावे तर दोन ते तीन दिवस अंधारात राहिली.

ग्राहकांचा आंदोलनाचा इशारा
येथील वीज वितरणच्या भोंगळ कारभाराकडे वरिष्ठांचे सतत दुर्लक्ष होत आहे. त्यामुणे ग्राहक संतापले आहे. त्यांच्या संतापाचा स्फोट होण्याची चिन्हे आहे. यापूर्वीच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या कार्यकाळात वेळापत्रकानुसार वीज पुरवठा खंडित केला जात होता. मात्र विद्यमान उपकार्यकारी अभियंता आले तेव्हापासून पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले. त्यांच्या भोंगळ कारभाराने दिग्रसकर त्रस्त आहे. वीज बिलाची वसुली करता, त्याचप्रमाणे सेवा का देत नाही, असा ग्राहकांचा सवाल आहे. स्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिग्रसकरांनी दिला आहे. वीज तिरणला भानावर कसे आणायचे, ते दिग्रसकरांना ठाऊक असल्याचा दमही भरण्यात आला आहे.

ग्राहकांचे हाल, कर्मचाऱ्यांचा अभाव
येथील वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाने कळस गाठला आहे. गेल्या आठवड्यापासून कंपनीने दिग्रसकरांना वेठीस धरले आहे. दिवसा सोडाच रात्रीसुद्धा वीज ठप्प राहात असल्याने ग्राहक संतापले आहे. त्यांच्या संतापाचा आता उद्रेक होण्याची शक्यता आहे. दिग्रस येथे महावितरणमध्ये केवळ सातच कर्मचारी कार्यरत आहे. कर्मचाºयांचा अभाव असल्यामुळेही ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी आहे.

Web Title: Dismal power distribution work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.