शॉर्ट सर्किटने डेकोरेशन साहित्याचा कोळसा; तीन लाखांच्या नुकसानीचा अंदाज 

By विलास गावंडे | Published: November 22, 2023 05:54 PM2023-11-22T17:54:04+5:302023-11-22T17:55:41+5:30

चिकणी येथील घटना

decoration material burnt due to Short circuit; estimated loss of three lakhs | शॉर्ट सर्किटने डेकोरेशन साहित्याचा कोळसा; तीन लाखांच्या नुकसानीचा अंदाज 

शॉर्ट सर्किटने डेकोरेशन साहित्याचा कोळसा; तीन लाखांच्या नुकसानीचा अंदाज 

नेर (यवतमाळ) : शॉर्ट सर्कीटने लागलेल्या आगीत डेकोरेशन साहित्याचा कोळसा झाला. शिवाय घराचेही नुकसान झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चिकणी डोमगा (ता.नेर) येथे घडली. या घटनेत तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मंडप डेकारेशन व्यवसायिक असलेले दीपक देविदास चव्हाण (रा. चिकणी) यांच्या घराला आग लागली. या घटनेत त्यांच्या घरातील विविध वस्तू जळाल्या. शिवाय घरात ठेवून असलेल्या डेकोरेशन साहित्याचाही कोळसा झाला. गाद्या, स्पिकर, मंडप साहित्य जळाले. घर पेटत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी आपापल्या परीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चव्हाण यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: decoration material burnt due to Short circuit; estimated loss of three lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.