यवतमाळमध्ये ४६ मॉडेल स्कूलची निर्मिती; जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट

By विशाल सोनटक्के | Published: October 13, 2023 06:20 PM2023-10-13T18:20:13+5:302023-10-13T18:20:50+5:30

पालकमंत्री राठोड यांची संकल्पना

Creation of 46 model schools in Yavatmal; Zilla Parishad schools will be transformed | यवतमाळमध्ये ४६ मॉडेल स्कूलची निर्मिती; जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट

यवतमाळमध्ये ४६ मॉडेल स्कूलची निर्मिती; जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट

यवतमाळ : जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी ‘शिक्षण चेतना’ या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या ४६ मॉडेल स्कूलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. या योजनेसाठी जिल्हा खनिकर्म योजनेतून ४० कोटी ८० लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री राठोड यांनी या योजनेबद्दल माहिती दिली. या योजनेमुळे जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त केला. जिल्ह्यातील ज्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शंभरपेक्षा जास्त पटसंख्या आहे, त्या शाळांची पुनर्बांधणी करणे, नवीन इमारत बांधणे, शाळांमध्ये शौचालय, चांगल्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा, भौतिक व अत्याधुनिक सोयीसुविधा, स्मार्ट आणि डिजिटल शाळा करण्यासाठी या योजनेतून पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले.

सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे. नवी पिढी सक्षम झाली पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत, त्यांचा विकास झाला पाहिजे, असे सांगत स्मार्ट अंगणवाडी करण्यासाठीही नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचे ते म्हणाले. मॉडेल स्कूल प्रकल्पासाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. या मॉडेल स्कूलमध्ये डेस्क, बेंच, आनंददायी पद्धतीने अध्ययन व अध्यापन प्रकिया होण्यासाठी अत्याधुनिक व भौतिक सुविधायुक्त अशा ४६ मॉडेल स्कूलची निर्मिती प्रायोगिक तत्त्वावर केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली आहे. या समितीच्या शिफारशीने शाळांची निवड करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Creation of 46 model schools in Yavatmal; Zilla Parishad schools will be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.