जिल्ह्यात ‘एसटी’ कामगारांचा संप संमिश्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:19 PM2018-06-08T23:19:31+5:302018-06-08T23:19:31+5:30

‘एसटी’ कामगारांनी वेतनवाढीविरोधात पुकारलेला अघोषित संप जिल्ह्यात संमिश्र राहिला. पांढरकवडा आगारातून अपवादानेच बस मार्गावर धावली. त्या खालोखाल वणी, पुसद आणि उमरखेडमध्ये बंदचा परिणाम जाणवला.

Composite merger of 'ST' workers in the district | जिल्ह्यात ‘एसटी’ कामगारांचा संप संमिश्र

जिल्ह्यात ‘एसटी’ कामगारांचा संप संमिश्र

Next
ठळक मुद्देपांढरकवडा कडकडीत : पुसदच्या आठ कामगारांसह जिल्ह्यात ४६ निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘एसटी’ कामगारांनी वेतनवाढीविरोधात पुकारलेला अघोषित संप जिल्ह्यात संमिश्र राहिला. पांढरकवडा आगारातून अपवादानेच बस मार्गावर धावली. त्या खालोखाल वणी, पुसद आणि उमरखेडमध्ये बंदचा परिणाम जाणवला. दरम्यान, महामंडळाचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत ४६ कामगारांना निलंबित करण्यात आले. यात पुसद आगाराच्या आठ कामगारांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील नऊही आगारातून दुपारी ४ वाजतापर्यंत ८८७ पैकी ४८० फेऱ्या रद्द झाल्या होत्या. यात प्रामुख्याने ग्रामीण भागात धावणाºया बसफेºयांचा समावेश आहे. पांढरकवडा येथून १०० पैकी केवळ तीन फेºया मार्गावर गेल्या. पुसद आगारातून १३९ पैकी केवळ ५९ फेºया सोडण्यात आल्या. वणी येथून ८३ पैकी केवळ १४ बसेस मार्गावर गेल्या. उमरखेड येथे १३२ पैकी ४८ फेºया विविध मार्गावर धावल्या. नेर येथे ७३ मधून ३४, दिग्रस येथे ४८ पैकी ४२ आणि राळेगाव येथे ५८ पैकी ५० फेऱ्या मार्गावर सोडण्यात आल्या.
जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ आगारात संपाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १७५ पैकी १५१ फेºया या आगारातून सोडण्यात आल्या. दारव्हा आगार १०० टक्के सुरू राहिला. सर्व ७९ फेºया या आगारातून सोडण्यात आल्या होत्या. सकाळी बसफेºया सोडण्याची गती साधारण होती. दुपारनंतर धावणाºया फेºया कमी झाल्या. सकाळी २५ टक्के असलेले हे प्रमाण दुपारनंतर जवळपास ५५ टक्क्यावर पोहोचले होते. संपाची कुठलीही नोटीस देण्यात आलेली नव्हती. अचानक बसफेºया रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करत कामगारांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला आहे. हा संप यशस्वी झाल्याचा दावा काही कामगार संघटनांकडून केला जात आहे.
कामगार सेनेचा सहभाग नाही
घाटंजी : कामगार सेनेचे सदस्य संपापासून दूर राहिले. यवतमाळ आगाराच्या काही फेºया घाटंजीवरून किनवट मार्गावर धावल्या. परंतु पांढरकवडा आगाराच्या गाड्या पूर्णपणे बंद होत्या. कामगार सेनेच्या सदस्यांमुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय कमी झाल्याचे सांगितले जाते. बसेस नसल्याने काही प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेतला.
इंटक व कामगार संघटनेचे नेतृत्व
पुसद : इंटकचे अध्यक्ष गफ्फार पठाण आणि कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद उत्तरवार यांच्या नेतृत्त्वात पुसद आगारातील कामगार संपात सहभागी झाले होते. कामगार सेना आणि महाराष्ट्र मोटर फेडरेशन कामगार संघटना संपात सहभागी नसल्याचे सांगण्यात आले. या आगारात संप ५० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला जाणार आहे. आगार व्यवस्थापक प्रताप राठोड म्हणाले, दररोज दुपारी १ वाजतापर्यंत ३६ गाड्यांचे शेड्यूल असते. मात्र कर्मचाºयांच्या संपामुळे २० गाड्या निघाल्या, तर १६ रद्द झाल्या असे ते म्हणाले.

Web Title: Composite merger of 'ST' workers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.