ठळक मुद्देवणी ग्रामीण रूग्णालय : दोषींवर कारवाईची टांगती तलवार, समितीत तीन डॉक्टरांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : बुधवारी पहाटे येथील ग्रामीण रुग्णालयातून नुसरत जबीन या महिलेच्या नवजात बाळाचे अपहरण केल्यानंतर रुग्णालयातील अनागोेंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या गंभीर घटनेची दखल घेत या घटनेच्या चौैकशीसाठी जिल्हास्तरावर एका समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीने घटनेनंतर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात येऊन संबंधित डॉक्टर व कर्मचाºयांची बयाणे नोंदविली.
येत्या दोन दिवसांत या चौकशीचा अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतर दोषी असलेल्या कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.जी.टी.धोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मूळचे कोल्हापूर येथील रहिवासी असलेले डॉ.चंद्रशेखर खांबे हे वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आहेत. मात्र कुटुंबापासून दूर राहून त्यांना कर्तव्य बजावावे लागत असल्याने त्यांना येथील कामात रस नसल्याचे वारंवार घडणाºया घटनांवरून दिसून येते. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे रुग्णालयात काम करणारे कर्मचारीही सैैराट झाले असून त्याचा दुष्परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. विविध घटनांनी कायम चर्चेत राहणाºया ग्रामीण रुग्णालयात बुधवारी पहाटे आक्रीतच घडले. नवजात बालकाचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने रुग्णालयीन व्यवस्थेतील निष्काळजीपणाने कळसच गाठला गेला. या घटनेने आरोग्य यंत्रणा हादरून गेली. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जी.टी.धोटे यांनी तातडीने यवतमाळ येथील डॉ.तगडपल्लीवार, डॉ.चव्हाण व डॉ.बाजोरिया यांचा समावेश असलेल्या चौैकशी समितीचे गठण केले. या समितीने वणी ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात येऊन डॉक्टर व कर्मचाºयांची बयाणे नोंदविली. चौकशी अहवाल येत्या दोन दिवसांत प्राप्त होणार असून त्यानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे.
तीनही आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल
अपहरण प्रकरणात पोलीस कोठडीत असलेले आरोपी रमेश कुंभारकर, गणेश वाघमारे व श्रीकांत चुनारकर यांच्याकडून पोलिसांची दिशाभूल केली जात आहे. नेमके बाळ कुणी पळविले, याबाबत हे तिघेही एकमेकांकडे बोट दाखवित असल्याची माहिती आहे. स्थळांबाबतही वेगवेगळी माहिती त्यांच्याकडून पोलिसांना दिली जात आहे. या आरोपींना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान, पोलिसांना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, अपहरणासाठी बडावत दाम्पत्याकडून आरोपींना देण्यात आलेली ३० हजारांची अग्रीम रक्कम जप्त करावयाची आहे.
अनागोंदीची तक्रार आरोग्य उपसंचालकांकडे
वणीच्या ग्रामीण रूग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. त्यातच बुधवारी एका दोन दिवसांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. ही घटना अतिशय गंभीर असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या कर्मचाºयांसोबतच जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.जी.टी.धोटे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे. यापूर्वीदेखील या रूग्णालयात जन्मलेले बाळ विकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र ते प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोपही कांबळे यांनी केला आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.