जिल्हा परिषदेत बदलीप्रक्रियेला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:08 AM2018-05-03T01:08:12+5:302018-05-03T01:08:12+5:30

जिल्हा परिषदेत विविध विभागातील बदली प्रक्रियेने वेग घेतला आहे. तूर्तास सामान्य प्रशासन विभागातील ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Changes in the Zilla Parishad process | जिल्हा परिषदेत बदलीप्रक्रियेला वेग

जिल्हा परिषदेत बदलीप्रक्रियेला वेग

Next
ठळक मुद्देज्येष्ठता यादी : शिक्षक बदल्यांचा गुंता कायमच, विविध विभागांच्या याद्या तयारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेत विविध विभागातील बदली प्रक्रियेने वेग घेतला आहे. तूर्तास सामान्य प्रशासन विभागातील ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
येत्या ३१ मे पूर्वी बदल्या करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. तथापि अनेक विभागांची यादी अद्याप तयारच झाली नाही. सध्या केवळ सामान्य प्रशासन विभागाची ज्येष्ठता यादी पूर्ण झाली असून ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत तब्बल ४४० कनिष्ठ सहायक, १२२ वरिष्ठ सहायक, २४ कक्ष अधिकारी, ३८ सांख्यीकी विस्तार अधिकारी, १४० कनिष्ठ प्रशासन अधिकारी आदींचा समावेश आहे. ही यादी प्रसिद्ध झाली. मात्र शिक्षक, आरोग्य, बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आदी विभागांच्या याद्या फायनल झाल्या नाहीत.
बदलीपात्र शिक्षकांची यादी एनआयसीकडून जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहे. नंतर शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला वेग येणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे लक्ष एनआयसीकडे लागले आहे. मात्र शिक्षकांच्या बदल्यांचा गुंता अद्याप कायम आहे. बदली धोरणावर शिक्षकांचे आक्षेप आहे. काही शिक्षक संघटनांनी बदल्यांविरोधात शासनाविरूद्ध रणशिंग फुंकले आहे. तथापि जवळपास १६ संघटना आमच्यासोबत असल्याने बदल्या करणारच, असा निर्धार शासनाने केला आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुक्कामी कर्मचाºयांना कुणाचे अभय?
जिल्हा परिषदेच्या काही विभागात गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात मुक्कामी आहे. मूळ नियुक्ती दुसऱ्या विभागात असलेले अनेक कर्मचारी दुसऱ्या विभागात प्रतिनियुक्तीवरही आहेत. काही कर्मचारी तर खास ‘साहेबां’नी आणले होते. ते बदलून गेल्यानंतरही असे कर्मचारी तेथेच आहे. त्यांना कुणाचे अभय आहे, याची चर्चा रंगली आहे.
संघटना पदाधिकाऱ्यांची चलती
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या काही संघटना पदाधिकाऱ्यांची सध्या भलतीच चलती आहे. एकाच संघटनेचे अध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांनी तर संघटनेला पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडे गहाण ठेवल्यासारखी स्थिती आहे. पदाधिकाऱ्यांचे पीए आणि सामान्य प्रशासनसारख्या महत्त्वाच्या विभागात जागा बळकविण्यासाठी त्यांनी संघटनेलाच दावणीला बांधल्याचे बोलले जात आहे. त्याच संघटनेचे समान्य सभासद मात्र बदलीसाठी प्रशासनाचे उंबरठे झीजवीत आहे.

Web Title: Changes in the Zilla Parishad process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.