धनगर समाजाचे आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 09:53 PM2019-02-23T21:53:15+5:302019-02-23T21:54:12+5:30

धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शनिवारी येथे धनगर समाज बांधवांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी देता की जाता, असा इशाराही समाजबांधवांनी देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

The agitation of the Dhangar community | धनगर समाजाचे आक्रोश आंदोलन

धनगर समाजाचे आक्रोश आंदोलन

Next
ठळक मुद्देसरकारविरुद्ध घोषणाबाजी : अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शनिवारी येथे धनगर समाज बांधवांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी देता की जाता, असा इशाराही समाजबांधवांनी देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
धनगर समाज संघर्ष समितीच्या पुढाकाराने यवतमाळात हे आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या गेल्या काही वर्षातील सततच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्य सरकारने काही निर्णय घेतले. मात्र धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे, या मागणीकडे कायमच सरकारने दुर्लक्ष केले. निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला दिलेला शब्द सरकारने पाळला नाही. त्यामुळे शनिवारी समाजबांधवांनी यवतमाळात आपला आक्रोश व्यक्त केला.
स्थानिक तिरंगा चौकात धनगर समाज बांधव एकवटले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विशेष म्हणजे मोर्चाच्या अग्रस्थानी महिलाच होत्या. सरकारने शब्द पाळला नाही, अशा घोषणा देत धनगर बांधवांनी राज्य शासनाच्या विरोधात तीव्र संताप नोंदविला. सरकारने शब्द पाळावा अन्यथा चालते व्हावे, असे म्हणत धनगर बांधवांनी रोष नोंदविला.
यावेळी खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पांडुरंग खांदवे, श्रीधर मोहोड, डॉ.संदीप धवने, संजय पाटील शिंदे, डॉ.रमेश महानूर, डॉ.प्रियंका धवने, अविनाश जानकर, उमेश अवघड, दिलीप पुनसे, प्रफुल्ल लोखंडे, गजानन मासोळे, राजेश गायनार, कैलास शिंदे आदी सहभागी झाले होते.
निवडणुकीच्या तोंडावर सरकारला इशारा
२०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपाने धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे आता २०१९ च्या निवडणुकीपूर्वी मोर्चाद्वारे समाजाने सरकारला इशारा दिला आहे.

Web Title: The agitation of the Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा