विदर्भात चार महिन्यात ४१६ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:44 AM2019-09-14T11:44:08+5:302019-09-14T11:47:41+5:30

विदर्भात गत चार महिन्यांत ४१६ शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा झाली. या घटनांनी विदर्भ हादरला आहे. कृषी विभागाने अंतरप्रवाही कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

416 farmers, farm laborers suffered from pesticide poison in Vidarbha | विदर्भात चार महिन्यात ४१६ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

विदर्भात चार महिन्यात ४१६ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

Next
ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा हादरलीअंतरप्रवाही औषधांवर बंदीच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अंतरप्रवाही कीटकनाशकांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विदर्भात गत चार महिन्यांत ४१६ शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा झाली. या घटनांनी विदर्भ हादरला आहे. कृषी विभागाने अंतरप्रवाही कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
यावर्षीच्या हंगामात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक १३८ शेतकरी, मजुरांना विषबाधा झाली. यवतमाळ जिल्ह्यात ३३ घटना घडल्या. बुलडाण्यात ९६, वाशिममध्ये १०० तर अमरावती जिल्ह्यात ४९ घटना घडल्या आहेत. चार महिन्यांत विदर्भात ४१६ रूग्णांना विषबाधा झाली. विषबाधितांना शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले. युद्धपातळीवर उपचार करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र अशा घटना घडू नये म्हणून ठोस उपाययोजनांची नितांत गरज आहे.

मोनोक्रोटोफॉस, कॉम्बीनेशनमधील प्रोफेनोफॉस, अ‍ॅसेफेट, इमीडा ४० प्लस सायप्रेमेथ्रीन ४० या चार अंतरप्रवाही औषधांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव असून केंद्र शासनाच्या निर्णयावर ही बंदी अवलंबून आहे.
- पंकज बर्डे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ

Web Title: 416 farmers, farm laborers suffered from pesticide poison in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती