Next

मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा धावणार व्हिक्टोरिया! | Victoria Carriages Back On Mumbai's Street

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 11:12 AM2021-03-13T11:12:03+5:302021-03-13T11:12:36+5:30

एक वैशिष्ट्य म्हणजे ‘व्हिक्टोरिया’ किंवा मुंबईची आवडती घोडागाडी. या 'व्हिक्टोरियात गाडीला चालविण्यासाठी घोड्यांचा वापर होत असल्याने डिसेंबर 2015 पासून व्हिक्टोरिया गाड्यांवर बंदी लादण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईतील रस्त्यांवर व्हिक्टोरिया गाडी धावणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून मान्यता देखील देण्यात आली आहे. आता पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात हे इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गी मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे.