Next

जेव्हा 'हिंदू व्होटबँक'मुळे बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता... Balasaheb Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 04:05 PM2021-12-17T16:05:27+5:302021-12-17T16:07:25+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक डेव्हलप केली, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं. त्यामुळे हिंदू व्होटबँक शब्द चर्चेत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकात पाटलांना उत्तर दिलं, या देशात हिंदूची व्होटबँक हा पहिला विचार बाळासाहेब ठाकरेंनी मांडला होता असं संजय राऊत म्हणाले. पण तुम्हाला माहितेय का की हिंदू व्होटबँकेच्या मुद्द्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना ६ वर्ष आपला मतदानाचा अधिकार गमवावा लागला होता? इतकंच काय तर बाळासाहेब ठाकरेंवर निवडणूक लढवण्याचीही बंदी आली होती, याच मुद्द्यावर शिवसेनेच्या दोन आमदारांची आमदारकीही रद्द झाली होती. हिंदू व्होटबँक...एका शब्दामुळे बाळासाहेंबावर कारवाई झाली, मग चंद्रकांत पाटलांवर कारवाई का होत नाही? चंद्रकांत पाटलांवर आता कारवाई होणार का? तेव्हा असं काय घडलं होतं की बाळासाहेबांकडून मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता? त्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली होती, तशी बंदी नसती तर युती सरकारमध्ये बाळासाहेब मुख्यमंत्री झाले असते का यावरच आपण बोलूयात पुढच्या ३ मिनिटात. फॅक्ट्स इंटरेस्टिंग आहेत, रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा. नमस्कार मी अनिकेत पेंडसे तुम्ही पाहताय लोकमत.