Next

नवी तारीख, नवं भाकित...महाविकास आघाडी सरकार 'या' तारखेला पडणार? Shiv Sena vs BJP | Chandrakant Patil

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:45 AM2022-02-11T00:45:49+5:302022-02-11T00:46:19+5:30

दोनच दिवसांपूर्वी संजय राऊतांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं. यात त्यांनी सरकार पाडण्यासाठी आपल्यावर दवाब टाकला जातोय, असा गंभीर आरोप केला. आता संजय राऊतांचा हा आरोप ताजा असतानाच भाजपनं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवीन तारीख दिलीय. ही नवीन तारीख देताना भाजपनं जे कारण दिलंय त्यावरुन चर्चा सुरु झालीय. भाजपनं सरकार पाडायची नवी तारीख काय दिलीय, संजय राऊतांनी आता त्यावर काय म्हटलंय, महाविकास आघाडी सरकारला धोकाच नाही मग तरी परत ही चर्चा का सुरु झाली यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात भाजपनं सरकार पाडण्यासाठी नवीन तारीख कोणती दिलीय ते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांनी सरकार पाडण्यासाठी नवीन तारीख दिलीय...