Next

Nawab Malik दुबईत, वानखेडेंवर मध्यरात्री ट्विटहल्ला;'हा' फोटो पाहून तुम्हीही हादराल! Sameer Wankhede

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 02:15 PM2021-11-22T14:15:27+5:302021-11-22T14:16:00+5:30

वानखेडे हे मुस्लिमच आहेत आणि त्यांनी खोटं सर्टीफिकेट देऊन नोकरी मिळवली हे सिद्ध करण्यासाठीच वारंवार मलिक आणि कुटुंब वानखेडेंच्या लग्नातले फोटो टाकतायंत. कधी लग्नाचं इन्विटेशन कार्ड तर कधी लग्न झाल्याचं म्हणजे मॅरेज सर्टीफिकेट टाकतायंत. अशातच आता नवाब मलिकांनी दुबईहून समीर वानखेडेंच्या लग्नातलाच आणखी एक फोटो ट्विट केलाय. मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत समीर वानखेडे तर दिसत आहेतच पण त्यांच्यासोबत आणखीही एक व्यक्ती दिसतोय. ही व्यक्ती निकाह वाचणारा काझी असावा असा अंदाज लावला जातोय. वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचं दिसतंय. मात्र त्याबाबत अधिक काहीही न लिहिता..फोड न करता मलिक यांनी फोटोवरूनच सवाल केलाय. 'कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असं प्रश्नार्थक ट्वीट या फोटोसह मलिक यांनी केलंय.