लाइव न्यूज़
 • 02:34 PM

  नवी दिल्ली : कांद्याचं किमान निर्यातमूल्य 850 डॉलर प्रतिटन, निर्यात कमी व्हावी, स्थानिक बाजारातील दर जास्त वाढू नयेत, या उद्देशाने निर्यातमुल्यात वाढ, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.

 • 02:27 PM

  मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात नाभिक समाज आक्रमक, 2 डिसेंबरपासून राज्यभर रास्ता रोको करणार, 13 डिसेंबरला नागपुरात 11 हजार जण मुंडन करुन केस मुख्यमंत्र्यांना भेट देणार.

 • 02:26 PM

  औरंगाबाद: प्लास्टिक बंदी संदर्भातील नियम प्रत्येक प्लास्टिक उत्पादकाला पाळावे लागतील. हा देश हिताचा निर्णय असल्याने मुजोरी खपवून घेणार नाही. रामदास कदम यांचा इशारा.

 • 02:23 PM

  मुंबई- उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटलांची बैठक संपली. बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा नाही. राणेंबाबत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री निर्णय घेतील.चंद्रकांत पाटील यांची माहिती. मातोश्रीवर दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा.

 • 01:59 PM

  नवी मुंबई- आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात. सिडकोच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी दौरा.

 • 01:47 PM

  मुंबई- वसंत डावखरे यांची प्रकृती खालावली. भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल. शरद पवार हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्याची माहिती.

 • 01:31 PM

  सांगली : अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी युवराज कामटे, अनिल लाड, अरूण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, जाकिर पट्टेवाले या सर्वांची रवानगी कळंबा कारागृहात.

 • 01:20 PM

  गडचिरोली- प्रेमसंबंधात शारीरिक शोषण केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित, नागपूरमधे दाखल झाला होता बलात्काराचा गुन्हा.

 • 01:05 PM

  उल्हासनगर मनपा आयुक्तांवरील अॅट्रोसिटीच्या विरोधात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

 • 01:01 PM

  हिंगोली : लग्नाच्या वरातीमधील एकास एसटी बसची जोरात धडक, संत पोलीस कवायत मैदानाजवळील घटना.दिनेश परतवार जखमीचे नाव.

 • 12:50 PM

  औरंगाबादः सरकारी कार्यालयात प्लास्टिक बंद करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांचे आदेश. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन दिले आदेश.

 • 12:44 PM

  आयसी 814 विमान अपहरण प्रकरणात दोषी ठरलेल्या अब्दुल मोमीनचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

 • 12:33 PM

  कोल्हापूर- रायगड कॉलनीतील साई दिशा सराफपेढीत चोरी. 6 लाखाचा ऐवज लंपास. गुरूवारी सकाळची घटना.

 • 12:28 PM

  मुंबई- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मातोश्रीवर. चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची घेणार भेट. विनोद तावडेही उपस्थित.विधानपरिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपा उमेदवाराला पाठिंबा मागण्यासाठी भाजपाचं मतोश्रीला साकडं.

 • 12:24 PM

  बीड- खा. प्रीतम मुंडे यांचं बनावट लेटरपॅड वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघड. पंडित दिनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली तीन एकर जागेसाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार.

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या