Next

5 राज्यात भाजपने खर्च केले 'इतके' कोटी Highest Spending Party Over Election India | BJP | Trinamool

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 04:43 PM2021-11-15T16:43:50+5:302021-11-15T16:44:16+5:30

या वर्षाच्या सुरुवातीलाच आसाम, पुदुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या पाच राज्यात निवडणुकांचा धुराळा उडाला... यातील पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.. परंतु ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने भाजपला चितपट करत पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं.. या पाचही राज्याच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी किती पैसे खर्च केले याची आकडेवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली.. या आकडेवारीनुसार या पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक पैसा खर्च केल्याचे सांगितले जात आहे..