सुजलाम सुफलाम अभियानाच्यावतीने पाणी व्यवस्थापन कार्यशाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 04:09 PM2019-03-09T16:09:46+5:302019-03-09T16:10:11+5:30

कारंजा तालुक्यात जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या ग्राम मोखड गावात जागतीक महीला दिन व पाणी व पीक व्यवस्थापन कार्यशाळा ८ मार्च रोजी ग्राम पंचायत मोखड येथे पार पडली. 

Water Management Workshop on Sujalam Suphalam Abhiyan | सुजलाम सुफलाम अभियानाच्यावतीने पाणी व्यवस्थापन कार्यशाळा 

सुजलाम सुफलाम अभियानाच्यावतीने पाणी व्यवस्थापन कार्यशाळा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा :  भारतीय जैन संघटना व जसंधारण विभाग यांच्यावतीने सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम दुष्काळ मुक्त अभियाना अंतर्गत कारंजा तालुक्यात जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या ग्राम मोखड गावात जागतीक महीला दिन व पाणी व पीक व्यवस्थापन कार्यशाळा ८ मार्च रोजी ग्राम पंचायत मोखड येथे पार पडली. 
भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित पाणी व पिक व्यवस्थापन कार्यशाळेला सुजलाम सुफलाम अभियानाचे सामाजिक प्रशिक्षक उदय नाटकी, तांत्रिक प्रशिक्षक मिलींद कुकडे, अमोल राउत, जिल्हा पर्यवेक्षक  अभिलाश नरोडे, सरपंच अब्दुल शेख, उपसरपंच सुजाता निमगडे, भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष  व तालुका सन्वयक अक्षय सेलसुरकर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी सर्वप्रथम सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून भारतीय जैन संघटनेच्यावतीने महीलांचा गुलाब पुष्य देउन सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित सुजलाम सुफलाम च्या टिमने गावतील महीला व पुरूष मंडळीना पाणी व्यवस्थापन, पिक व्यवस्थापन तसेच माथा ते पायथा पाणलोटाची कामे कश्या पध्दतीने करायची या बाबत माहीती देण्यात आली. तसेच आदर्श गाव हिवरे बाजार येथील गावक-यांनी तयार केलेले वाटर बजेट तसेच गावात झालेल्या जलसंधारणा कामाची माहीती फिल्मव्दारे दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे  आभार अक्षय सेलसुरकर यांनी केले.

Web Title: Water Management Workshop on Sujalam Suphalam Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.