वाशिम- कवठळवासियांचा तहसील कार्यालयावर घागर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 01:47 PM2018-04-02T13:47:05+5:302018-04-02T13:47:05+5:30

Washim- Ghaggar Morcha on Kavathalwasia Tehsil Office | वाशिम- कवठळवासियांचा तहसील कार्यालयावर घागर मोर्चा

वाशिम- कवठळवासियांचा तहसील कार्यालयावर घागर मोर्चा

Next

मंगरुळपीर (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यात सद्यस्थितीत भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ग्रामीण भागात अनेकांना दूरवरुन पाणी आणण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. या निषेधार्थ तालुक्यातील कवठळवासियांनी तहसील कार्यालयावर २ एप्रिल रोजी मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.
गावात पाण्याचा एकही थेंब नसल्याने कवठळवासियांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी गावातील पुरुष , महिलांनी तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढून कवठळ गावाला पाणी टंचाई मुक्त करा, पाणी पुरवठा करा यासह विविध घोषणा करीत तहसीलदारांना निवेदन दिले. तसेच लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी कवठळवासियांनी दिला. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह ग्रामस्थ व महिलांचा मोठया प्रमाणात समावेश होता.

Web Title: Washim- Ghaggar Morcha on Kavathalwasia Tehsil Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.