वाशिम जिल्ह्यात ४८०० सिंचन विहिरी अपूर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 01:29 PM2018-08-05T13:29:01+5:302018-08-05T13:29:55+5:30

वाशिम : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सहस्त्र सिंचन विहिर योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सहा हजार विहिरींपैकी ३१ जुलैपर्यंत १२०० विहिरींचे काम पूर्ण झाले तर ४८०० विहिरी अद्याप अपूर्णावस्थेत आहेत.

There are 4800 irrigation wells in Washim district | वाशिम जिल्ह्यात ४८०० सिंचन विहिरी अपूर्णावस्थेत

वाशिम जिल्ह्यात ४८०० सिंचन विहिरी अपूर्णावस्थेत

Next
ठळक मुद्दे जुलै २०१८ अखेर सहा हजार विहिरींपैकी १२०० विहिरींची कामे पूर्ण झाली. उर्वरित ४८०० विहिरींची कामे अपूर्णावस्थेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सहस्त्र सिंचन विहिर योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सहा हजार विहिरींपैकी ३१ जुलैपर्यंत १२०० विहिरींचे काम पूर्ण झाले तर ४८०० विहिरी अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. प्रचंड दिरंगाई करणाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सहस्त्र सिंचन विहिर योजना राबवलिी जात आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंब, स्त्री कर्ता प्रधान कुटुंब, शारिरिकदृष्ट्या विकलांग, जमिन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, याप्रमाणे लाभार्थींची निवड केली जाते. जानेवारी २०१७ मध्ये लाभार्थी निवड प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर विहीर बांधकामाला सुरूवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जुलै २०१८ अखेर सहा हजार विहिरींपैकी १२०० विहिरींची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ४८०० विहिरींची कामे अपूर्णावस्थेत आहेत.अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच, प्रचंड दिरंगाई करणाºयांविरूद्ध कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला.

Web Title: There are 4800 irrigation wells in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.