भर पावसात विद्यार्थ्यांना करावी लागतेय बसची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:02 PM2018-08-20T16:02:25+5:302018-08-20T16:03:53+5:30

शेलुबाजार  (वाशिम):  स्थानीक मुख्य चौकातील प्रवासी निवारा पुर्णपणे उध्वस्त झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना भर पावसात चक्क रस्त्यावर बसची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.

Students wait for the bus in rain | भर पावसात विद्यार्थ्यांना करावी लागतेय बसची प्रतिक्षा

भर पावसात विद्यार्थ्यांना करावी लागतेय बसची प्रतिक्षा

Next
ठळक मुद्देरस्त्यावर उभे राहून बसची प्रतिक्षा करावी लागत असल्याने केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्यात उन्हापासून तर पावळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी  कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही .

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार  (वाशिम):  स्थानीक मुख्य चौकातील प्रवासी निवारा पुर्णपणे उध्वस्त झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना भर पावसात चक्क रस्त्यावर बसची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.
शेलुबाजार परिसरातील अनेक खेडयातील विद्यार्थ्यी शेलुबाजार येथे शिक्षणासाठी येºजा करतात. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना  संध्याकाळी अतिशय रहादारीच्या रस्त्यावर उभे राहून बसची प्रतिक्षा करावी लागत असल्याने केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रोजच्या प्रकाराने शाळकरी विद्यार्थींना मानसीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .याकडे मात्र कुणाचेही लक्ष दिसून येत नाही.
प्रवासी निवारा अभावी विशेष करुन महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणाहून शेकडो प्रवासी अकोला, मंगरुळपीर, मालेगाव, कारंजा आदी ठिकाणी ये-जा करतात.  याच प्रवाशांना एसटी महामंडळाने कुठल्याच प्रकारची व्यवस्था करुन दिली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हापासून तर पावळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी  कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही . दुसºयांच्या दुकानासमोर आसरा घेवून बसची ताटकळत वाट पहावी लागत आहे. 

लांभाडे यांचा आंदोलनाचा इशारा
४शेलुबाजार चौकातील प्रवासी निवारा दुरुस्त करण्यात आला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा समाजसेवक विनोद लांभाडे यांनी दिला आहे.
४अनेक वर्षांपासून प्रवासी निवाºयाच्या झालेल्या दुरावस्थेकडे कोणाचेच लक्ष दिसून येत नसल्याने प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.

Web Title: Students wait for the bus in rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.