नागपुरात होणार विदर्भातील 'अग्नीविरांची' निवड; दहा जिल्ह्यातील ५९,९११ उमेदवारांनी केली नोंदणी

By दादाराव गायकवाड | Published: September 6, 2022 06:40 PM2022-09-06T18:40:23+5:302022-09-06T18:41:16+5:30

अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात ४ वर्षांच्या काळासाठी भरती केल्या जाणाऱ्या अग्नीविरांची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे.

Selection of Vidarbha's agniveers to be held in Nagpur, registration of 59,911 candidates in ten districts completed | नागपुरात होणार विदर्भातील 'अग्नीविरांची' निवड; दहा जिल्ह्यातील ५९,९११ उमेदवारांनी केली नोंदणी

नागपुरात होणार विदर्भातील 'अग्नीविरांची' निवड; दहा जिल्ह्यातील ५९,९११ उमेदवारांनी केली नोंदणी

Next

वाशिम : सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात ४ वर्षांच्या काळासाठी भरती केल्या जाणाऱ्या अग्नीविरांची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यातील अग्नीविरांची निवड प्रक्रिया नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. नागपूर जिल्हाप्रशासनाने या निवड प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला असल्याची माहिती वाशिम जिल्हा प्रशासनाने मंगळवार ६ सप्टेंबर रोजी दिली.  

अग्नीपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा निहाय निवड प्रक्रिया आता मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. 'अग्निवीर' अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी झाली असून नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुल हे योग्य स्थळ असून याच ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली जाईल असे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा व अन्य व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दिल्या आहेत.

 

Web Title: Selection of Vidarbha's agniveers to be held in Nagpur, registration of 59,911 candidates in ten districts completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.