वाशिम जिल्ह्यातील १९ प्रकल्पांमधील गाळाचा होणार उपसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 07:02 PM2018-05-03T19:02:38+5:302018-05-03T19:02:38+5:30

वाशिम : जिल्ह्यात ३ मध्यम व १२३ लघू असे एकंदरित १२६ प्रकल्प आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक प्रकल्प यंदा कोरडे पडले असून दोन मध्यम व १७ लघुप्रकल्पांमधील गाळाचा उपसा करण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेतला आहे.

Up gradation of 19 projects in Washim district | वाशिम जिल्ह्यातील १९ प्रकल्पांमधील गाळाचा होणार उपसा!

वाशिम जिल्ह्यातील १९ प्रकल्पांमधील गाळाचा होणार उपसा!

Next
ठळक मुद्देया लघुप्रकल्पांमधील गाळाचा उपसा करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आलेला आहे.गाळ उचलून नेत आपल्या शेतात पसरवावा आणि यामाध्यमातून पिकांची उत्पादकता वाढवावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता बोरसे यांनी केले आहे. 


वाशिम : जिल्ह्यात ३ मध्यम व १२३ लघू असे एकंदरित १२६ प्रकल्प आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक प्रकल्प यंदा कोरडे पडले असून दोन मध्यम व १७ लघुप्रकल्पांमधील गाळाचा उपसा करण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेतला आहे. यानुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या मंजूरातीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यास लवकरच मंजुरात मिळून काम सुरू होईल, अशी माहिती येथील कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी गुरूवारी दिली.
वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी आणि सोनल या मध्यम प्रकल्पांसह वाईसावळी, सावंगा, कार्ली, उर्ध्व मोर्णा, सुदी, कुरळा, मालेगाव, कोल्ही, शिरपूटी, सुकांडा कोल्ही, रिधोरा, मोखड पिंप्री, हिवरा लाहे, शहा, मोहळ, मोहगव्हाण, ऋषी या लघुप्रकल्पांमधील गाळाचा उपसा करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यास मंजुरात मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असून याव्दारे ५ लाख क्युबीक मीटर गाळ हटविण्याचे उद्दीष्ट जलसंपदा विभागाने बाळगले आहे. शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने गाळ उचलून नेत आपल्या शेतात पसरवावा आणि यामाध्यमातून पिकांची उत्पादकता वाढवावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता बोरसे यांनी केले आहे. 

Web Title: Up gradation of 19 projects in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.