अंतिम मुदतवाढीनंतरही मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी वाशिम जिल्ह्यात ११४९ अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:25 PM2018-03-12T13:25:14+5:302018-03-12T13:25:14+5:30

वाशिम : वाशिम जिल्ह्यात अंतिम मुदतवाढीपर्यंत एकूण ११७३ जागेसाठी ११४९ आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर झाल्याने २४ जागा रिक्त राहणार आहेत.

In the district of Washim, there are 114 9 applications for free admission process even after the deadline! | अंतिम मुदतवाढीनंतरही मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी वाशिम जिल्ह्यात ११४९ अर्ज !

अंतिम मुदतवाढीनंतरही मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी वाशिम जिल्ह्यात ११४९ अर्ज !

googlenewsNext
ठळक मुद्दे२८ फेब्रुवारीपर्यंत वाशिम जिल्ह्यातून  केवळ ८७५ अर्ज दाखल झाले होते.७ मार्चनंतर परत एकदा ११ मार्चपर्यंत शासनाने प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. ११ मार्चपर्यंत एकूण ११४९ प्रवेश अर्ज दाखल झाले.

वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. वाशिम जिल्ह्यात अंतिम मुदतवाढीपर्यंत एकूण ११७३ जागेसाठी ११४९ आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर झाल्याने २४ जागा रिक्त राहणार आहेत.

शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीईअंतर्गत वाशिम जिल्ह्यात १०२ खासगी शाळांची नोंदणी झालेली असून, एकूण ११७३ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव आहेत. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के मोफत कोट्यातून प्रवेश देण्यासाठी  सुरूवातीला १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. २८ फेब्रुवारीपर्यंत वाशिम जिल्ह्यातून  केवळ ८७५ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर शासनाने प्रवेश अर्ज प्रक्रियेला ७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. ७ मार्चपर्यंत ११३४ प्रवेश अर्ज दाखल झाले होते. ७ मार्चनंतर परत एकदा ११ मार्चपर्यंत शासनाने प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. ११ मार्चपर्यंत एकूण ११४९ प्रवेश अर्ज दाखल झाले. वारंवार मुदतवाढ मिळाल्यानंतरही प्रत्यक्षात एकूण प्रवेश संख्येऐवढेही अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे २४ जागा रिक्त राहणार आहेत. शहरातील नामांकित शाळांसाठी विहित जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याने लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी मोफत प्रवेशाच्या अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार लवकरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.

Web Title: In the district of Washim, there are 114 9 applications for free admission process even after the deadline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.