ब्राम्हणवाडानजीकचा पूल खचला; वाहतूक प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 PM2021-07-12T16:25:39+5:302021-07-12T16:25:47+5:30

Washim News : मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावानजीकच्या नाल्यावरील पूल खचल्याने वाहतूक प्रभावित झाली.

The bridge near Brahmanwada was destroyed; Traffic affected | ब्राम्हणवाडानजीकचा पूल खचला; वाहतूक प्रभावित

ब्राम्हणवाडानजीकचा पूल खचला; वाहतूक प्रभावित

Next

वाशिम : गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १९.९० मीमी पाऊस झाला असून, मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावानजीकच्या नाल्यावरील पूल खचल्याने वाहतूक प्रभावित झाली.
यंदा चार लाख हेक्टरच्या आसपास खरिपाची पेरणी झाली आहे. पावसात सातत्य नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली. दरम्यान गत तीन, चार दिवसांपासून कमी- अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांना संजीवणी मिळत आहे. गत २४ तासांत जिल्ह्यात १९.९० मीमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे पिकांना संजीवणी मिळाली. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावानजीकच्या नाल्यावरील पूल खचून गेल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. एका बाजूने दुचाकी वाहने जाऊ शकतात; मात्र चारचाकी वाहने जात नसल्याने वाहतूक प्रभावित होत आहे. या पुलाची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
 
कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस
गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १९.९० मीमी पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस रिसोड तालुक्यात ३४.५० मीमी तर सर्वात कमी पाऊस कारंजा तालुक्यात ७.६० मीमी झाला. या पावसामुळे पिकांना संजीवणी मिळाली आहे.

Web Title: The bridge near Brahmanwada was destroyed; Traffic affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.