वसईत येशू ख्रिस्ताच्या आगमनाची चाहूल, नाताळ पूर्व आध्यात्मिक तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:33 PM2017-12-03T23:33:43+5:302017-12-03T23:33:43+5:30

वसईत रविवारपासून येशू ख्रिस्ताच्या येण्याची चाहूल सुुरु झाली आहे. नाताळ सणाच्या चार आठवडे अगोदरपासून येशूच्या आगमनासाठी आध्यात्मिक तयारी प्रत्येक चर्चमध्ये सुरु झाली आहे.

Vasayat appeals to the arrival of Jesus Christ, the Christmas pre-spiritual preparation started | वसईत येशू ख्रिस्ताच्या आगमनाची चाहूल, नाताळ पूर्व आध्यात्मिक तयारी सुरू

वसईत येशू ख्रिस्ताच्या आगमनाची चाहूल, नाताळ पूर्व आध्यात्मिक तयारी सुरू

Next

शशी करपे
वसई : वसईत रविवारपासून येशू ख्रिस्ताच्या येण्याची चाहूल सुुरु झाली आहे. नाताळ सणाच्या चार आठवडे अगोदरपासून येशूच्या आगमनासाठी आध्यात्मिक तयारी प्रत्येक चर्चमध्ये सुरु झाली आहे.
नाताळ सणाच्या चार आठवडे अगोदर सुरु होणाºया या दिवसात भाविकांची आध्यात्मिक तयारी सुरु होत असते. याच काळात ख्रिस्ती उपासनेचे नवे वर्ष सुुरु होते. चार आठवड्यातील चारही रविवारी वर्तुळाकार पुष्पचक्रावर तीन जांभळ््या आणि एक गुलाबी रंगाच्या मेणबत्या प्रत्येक रविवारी एक अशी प्रज्वलीत करून चर्चमधून येशू ख्रिस्त जन्माची आध्यात्मिक तयारी केली जाते.
या रविवारी पहिली जांभळी मेणबत्ती प्रज्वलीत करून लवकरच नाताळ सण येत असल्याची अधिकृत घोषणा चर्चेसमधून करण्यात आली. येत्या रविवारी दुसरी जांभळी मेणबत्ती प्रज्वलित करून ख्रिस्त जन्मी येत असल्याची घोषणा केली जाणार आहे. तर तिसºया रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलीत करून आंनद साजरा करण्यासाठी भाविकांना सांगितले जाणार आहे. चौथ्या रविवारी शेवटची जांभळी मेणबत्ती प्रज्वलीत करून येशूची आई मारिया हिच्या जीवनावर चिंतन करण्यास भाविकांना सांगितले जाणार आहे.
१९ व्या शतकात जर्मन येथील एका कुुटुंबाने पुष्पचक्रावर अशा रितीने मेणबत्या प्रज्वलीत करून नाताळ सणाच्या आगमनाची प्रथा सुरु केली होती. तिच आता जगभरातील चचर्नी पुढे सुरु ठेवली आहे. वुर्तळाकार पुष्पचक्र हिरव्या रंगाचा असून ख्रिस्ताच्या अनंत रुपाचे व अमर्याद प्रेमाचे प्रतिक मानले जाते. तर हिरवा रंग येशूच्या जीवनाचे झाड व शाश्वत जीवनाची आशा सूचित करते. मेणबत्या वाढत जाणारा देवाचा प्रकाश असल्याचे सांगते.
युरोपियन देशात या काळात हिमवर्षा होत असते. सर्व झाडांवर बर्फ असतो. मात्र, झाडांचे टोक हिरवे दिसत असते. हे टोक दिसणे म्हणजेच आशेचे किरण मानले जाते. वेदीजवळील हिरव्या रंगाचे पुष्पचक्र म्हणजेच येशू ख्रिस्त येण्याच्या आशेचे किरण मानले जाते, असे फादर विजय आल्मेडा यांनी सांगितले.

Web Title: Vasayat appeals to the arrival of Jesus Christ, the Christmas pre-spiritual preparation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.