कंटेनर व टेम्पो अपघातात दोन ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:50 AM2018-02-16T02:50:45+5:302018-02-16T02:50:50+5:30

मुंबई -अहमदाबाद महामार्गवर सोमटा येथे कंटेनर व टेम्पोच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 Two killed and four injured in container and tempo accident | कंटेनर व टेम्पो अपघातात दोन ठार, चार जखमी

कंटेनर व टेम्पो अपघातात दोन ठार, चार जखमी

googlenewsNext

कासा : मुंबई -अहमदाबाद महामार्गवर सोमटा येथे कंटेनर व टेम्पोच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महामामार्गवर सोमटा जवळ पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडून गुजरातकडे जाणाºया कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डिव्हायडर तोडून त्याने गुजरात कडून मुंबईकडे जाणाºया टेम्पोला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यात टेम्पो मधील रविंद्र जगन्नाथ यादव व प्रदिप सीताराम वाजे हे जागीच ठार झाले. तर आनंद बाळाराम झोटे, विवेक विठोबा माटे, विठ्ठल बारकु आखाडे, प्रवीण भगवान गवळी हे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, हा अपघात खूप भीषण असल्याने टेम्पोचा चक्काचूर झाला असून त्यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास ५ किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दारू पिऊन अथवा पुरेशी झोप न घेता रात्री वाहने चालविण्याच्या चालकांच्या सवयीमुळे असे अपघात या महामार्गावर सातत्याने घडत आहेत.

Web Title:  Two killed and four injured in container and tempo accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात