उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:50 AM2018-09-19T03:50:48+5:302018-09-19T03:51:04+5:30

ट्रॅफिक जॅमचा प्रश्न दिवसेंदिवस जटीलच; वाहनचालक,पादचारीही झाले त्रस्त

Traffic drivers due to open transformer | उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतूककोंडी

उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतूककोंडी

Next

विरार : वसईमध्ये रहदारीच्या ठिकाणी मोठमोठे ट्रान्सफॉर्मर रस्त्यावर उघडे पडलेले असल्याने आणि विजेचे खांब देखील अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी उभारल्याने वाहतूककोंडी होत असून चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
वाढती लोकसंख्या व अरुंद रस्ते यामुळे वसईत वाहूककोंडी होतच होती. मात्र आता रस्त्यावर असणाऱ्या या ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांमुळे ती अधिकच वाढली आहे. नागरिकांसोबत वाहतूक पोलीस देखील या उघड्या ट्रान्सफॉर्मरला कंटाळले आहेत. हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होतो ेआहे.
या तालुक्यातील रस्त्यांवर नागरीकांची व दुकानांचीच वर्दळ तर आहेच आता त्यात ट्रान्सफॉर्मरची देखील भर पडली असून वाहतुुकीस अडथळा निर्माण होता आहे. तर अनेकदा रस्त्यावरून चालणाºया नागरिकांच्या अंगावर या ट्रान्सफॉर्मर मधील गरम आॅईल अंगावर पडले आहे , असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. ज्या वेळी येथे नगरपरिषद होती तेव्हा येथील रस्त्ये हे कच्चे होते. त्यानंतर आता नगरपरिषदेची महानगरपालिका झाली, रस्ते सुधारले मात्र या ठिकाणी असणारे ट्रान्सफॉर्मर होते त्याच जागी तसेच आहेत, असे शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांचे म्हणणे आहे. हा प्रश्न कधी सुटतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

वसई तालुक्यातील रस्त्यांवर कुठे कुठे आहेत ट्रान्सफॉर्मर...
नायगाव पूर्वेतील जूचन्द्र, परेरा नगर, नायगाव पश्चिममधील उमेळमान, पापडी, कोळीवाडा, स्टेला, बभोला, दिवाणमान, आनन्द नगर, अंबाडी, माणिकपूर, सनसिटी, वसई पूर्वेकडील वालीव, सातीवली, धुमालनगर तर नालासोपारा पूर्व असणाºया अलकापुरी, आचोले रोड, एव्हरशाइन, शिर्डी नगर, गालानगर , तुळींज रोड, विजय नगर, मोरेगांव, नागिनदास पाडा, ओसवाल नगरी, प्रगतीनगर तर पश्चिम कडील सोपारा गांव, समेळपाडा, हनुमान नगर, श्रीप्रस्थ, पाटणकर पार्क तसेच विरार पश्चिमेला असणारे अर्नाळा, आगाशी, बोळींज, विराटनगर, पूर्व कडील चंदनसार, मनवेलपाडा, कारगीलनगर ह्या भागात ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या मध्ये उघडे पडले आहे. पावसाच्या वेळी ह्या ट्रान्सफॉर्मर मध्ये पाणी जाऊन ह्यातील करंट पाण्यात उतरतो व धोका अधिक वाढतो. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे या अशा ट्रान्सफॉर्मर मधील पाण्याच्या करंट ने तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जर ट्रान्सफॉर्मर बदलू शकत नसाल तर किमान त्याच्या बाजूला सुरक्षा भिंत तरी बांधावी असी मागणी नागरिकांनी केली आहे.

महापालिकेने महावितरणशी अनेकदा पत्रव्यवहार केला होता. मात्र हे ट्रान्सफॉर्मर आहे त्या जागेवरून दुसºया जागेवर हलवण्यासाठी आमचे तेवढे बजेट नसल्याचे महावितरणने सांगितले.
- अमोल जाधव
(वीज अभियंता-विरार वसई महानगरपालिका)

ट्रान्सफार्मरची जागा बदलण्याचा प्रस्ताव आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाºयांपुढे मांडला असून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध झाल्यावर हे रस्त्यावर असणारे ट्रान्सफार्मर बदलले जातील. निधी मंजूरीशिवाय याबाबत काही करणे अशक्य आहे.
- सूर्यकांत महाजन
(मुख्य अभियंता-महावितरण, वसई)

Web Title: Traffic drivers due to open transformer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.