टीडीसी बँकेतील रिक्तपदांच्या अर्जावर लावला जबर जीएसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 03:56 AM2017-11-01T03:56:35+5:302017-11-01T03:56:42+5:30

‘एक देश एक कर’ अशी भूमिका घेऊन केंद्र शासनाने व राज्य शासनाने अनेक वस्तू व सेवांवर लादलेल्या जीएसटीचा फटका नोकरी इच्छिणाºया बेरोजगारांना बसला आहे.

TDSC bailout application to GST | टीडीसी बँकेतील रिक्तपदांच्या अर्जावर लावला जबर जीएसटी

टीडीसी बँकेतील रिक्तपदांच्या अर्जावर लावला जबर जीएसटी

Next

विक्रमगड : ‘एक देश एक कर’ अशी भूमिका घेऊन केंद्र शासनाने व राज्य शासनाने अनेक वस्तू व सेवांवर लादलेल्या जीएसटीचा फटका नोकरी इच्छिणाºया बेरोजगारांना बसला आहे. त्यामुळे भरतीसाठी घेण्यात येणाºया परीक्षेच्या शुल्कामध्येही जीएसटी पहिल्यांदाच समाविष्ट झाल्याने त्यात मोठी वाढ झाली आहे. परिक्षेसाठी अर्ज करणाº्या अनेक परीक्षा देणाºया बेरोजगार गरीब आणि गरजू उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध पदाच्या २०५ जागांची जाहिरात विविध वृत्तपत्रांत व जिल्हा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे त्या नुसार विविधपदासाठी पदानुसार फी आकारण्यात आली असून तीवर पदानुसार ११८ रुपया पासून ते ७२ रुपयापर्यंत जीएसटी आकारण्यात आला आहे. हा कर स्पर्धा परीक्षांनाही शासन लागू करणार का..? केल्यास त्याचा फटका स्पर्धा परीक्षा देणाºया अनेक गरीब बेरोजगार तरुणांना बसणार? त्याचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन जीएसटीच्या नावे नाहक त्यांची लूट करणार असून त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करणाºया तरुणांना मोठा शॉक बसला आहे. तसेच त्यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्युनियर बँकिंग असिस्टंट ङ्क्त १६०पदे. परीक्षा फी ५५० आणि जीएसटी १०० रु पये अशी एकूण ६५० रु पये फी, सिनियर बँकिंग असिस्टंट ङ्क्त १९ पदे.परीक्षा फी ६०० आणि जीएसटीङ्क्त१०८ रु पये असे एकूण ७०८ रु पये फी, शिपाई ङ्क्त २० पदे, परीक्षा फी ४०० आणि जीएसटीङ्क्त ७२ रु पये असे एकूण ४७२ रु पये फी, वॉचमन ङ्क्त ३ पदांसाठी परीक्षा फी ४०० आणि जीएसटीङ्क्त ७२ रु पये असे एकूण ४७२ रु पये फी, अधिकारी जे एम ङ्क्त ३ पदे. परीक्षा फी ६५० आणि जीएसटीङ्क्त११८ रु पये असे एकूण ७६८ रु पये फी, आकारण्यात आली आहे. प्रामुख्याने राज्यात होणाºया विविध नोकर भरतीच्या परीक्षेसाठी प्रामुख्याने मागासवर्गीयांसाठी २०० ते ३०० व खुल्या वर्गासाठी ३०० ते ४०० रु पया पर्यंत फी आकारली जाते या बाबत गेल्या वर्षी शासन निर्णय ही झाला आहे परंतु ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीच्या फी मध्ये जीएसटी आकारल्याने याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसणार आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात फी आणि त्यावर आकरण्यात येणाºया जीएसटीमुळे अनेक गरीब विद्यर्ा्थ्यांना इच्छा असूनही त्यांना या नोकरभरतीच्या परिक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे त्यामुळे या नोकरभरतीचा फॉर्म भरून आपले नशीब आजमावणाºया ग्रामीण भागातील गरीब बेरोजगार सुशिक्षित तरु णांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच पुढील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली असून या नोकरभरतीच्या फीवर आकारण्यात येणाºया जीएसटी विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची काही विद्यार्थ्यांनी तयारी सुरु केली आहे. रोजगार, नोकºया मिळवून देणे दूरच राहिले त्यासाठी अर्ज करणेही परवडू नये अशा रितीने सरकारी कारभार सुरू आहे अशी टीका काही विद्यार्थी संघटंनांनी लोकमतशी बोलतांना केली आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँँकेच्या भरतीतील परीक्षेच्या फी वर जीएसटीकर आकारण्यात आला आहे ही दुर्दैवी बाब आहे. ही बँक शेतकºयांची आहे. या बँकेच्या नोकरभरतीत शेतकºयांची मुले अर्ज करणार आहेत. या वर्षी शेतकºयांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असतांना जीएसटी लावलेली ही अवास्तव फी भरतांना शेतकºयांच्या मुलांच्या नाकी नऊ नक्कीच येणार
आहेत.
-अमोल सांबरे, परीक्षार्थी

स्पर्धा परिक्षेच्या फी वर शासन जीएसटीसारखे कर आकारु न पैसे जमा करणार असेल तर ती मोठी खेदाची बाब ठरेल. अनेक इच्छुकांना कोणतेही उत्पन्न मिळविण्याचे साधन नाही. अशा स्थितीत ते एवढी फी कुठून भरणार? चार- पाच वर्षांपासून ते अभ्यास करीत आहेत. त्यांच्या स्वप्नांवर या फीमुळे पाणी पडणार आहे. या २०५ पदासाठी अंदाजे २० ते २५ हजार अर्ज येण्याची शक्यता आहे. या मध्ये मोठया प्रमाणात फी रुपात पैसे जमा होणार आहेत. या नोकर भरतीच्या प्रक्रियेसाठी इतका नक्की खर्च येईल का हा देखील संशोधनाचा विषय ठरेल.-सचिन विलास भोईर, अध्यक्ष, युवा स्पर्श

आम्ही परीक्षा घेण्यासंदर्भात मागवलेल्या निवेदितेत एकदम कमी रेट असलेल्या कंपनीला परीक्षा घेण्याचा ठेका दिला आहे. हा जीएसटीचा भार त्या कंपनीने त्यांच्या परीने लावला आहे. - राजन पाटील, चेअरमन, टि.डी.सी.बँक

Web Title: TDSC bailout application to GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी