अशी होणार नवपालघरची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:38 PM2017-11-09T23:38:41+5:302017-11-09T23:38:45+5:30

पालघर या नव्या जिल्हयाची निर्मिती करण्याचा स्थापन करण्याचा निर्णय १, आॅगस्ट २०१४ रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय साकारण्याची जबाबदारी शहर आणि

Such will be the formation of the new marathon | अशी होणार नवपालघरची निर्मिती

अशी होणार नवपालघरची निर्मिती

Next

पंकज राऊत
बोईसर : पालघर या नव्या जिल्हयाची निर्मिती करण्याचा स्थापन करण्याचा निर्णय १, आॅगस्ट २०१४ रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय साकारण्याची जबाबदारी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळावर सोपविली पालघर नवीन शहर प्रकल्पामध्ये, पालघर, कोळगाव, मोरकुरण, नंडोरे, दापोली, टेंभोडे आणि शिरगाव या सात महसूली गावाचा समावेश असेल.
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण विकसित करण्यामध्ये जिल्हा पातळीवरील विविध कार्यालयांसाठीच्या इमारती तसेच आवश्यक पायाभूत सुविधांंचा समावेश असून ही जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालया अंतर्गत पालघर येथे सिडकोतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, अतिथीगृह, जिल्हा परिषद कार्यालय, कर्मचाºयांसाठी निवासस्थाने तर नवीन प्रशासकीय इमारती (ब्लॉक - ए आणि बी) रस्ते, पदपथ, पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, विद्युत पुरवठा इ. पायाभूत सुविधा बरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत उभारण्यात येणार आहे.
पालघर जिल्हा मुख्यालय १०३.५७ हेक्टर क्षेत्रफळात ३ वर्षात वसविण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प पालघर - बोईसर राज्य महामार्गालगत असलेल्या सेक्टर - १५ कोळगाव - पालघर येथे वसविण्यात येणार असल्यामुळे येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोयीस्कर पडेल. केवळ प्रशस्त जागा हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असून जिल्हा मुख्यालयाचे हे ठिकाण येथील रहिवाशांना येण्या जाण्याच्या दृष्टीने सोयीचे असणार आहे. त्यामुळे त्यांची सरकारी कार्यालयाशी संबंधित कामे जलद गतीने पार पडण्यास मदत होईल. उत्कृष्ट सार्वजनिक पायाभूत सुविधा पुरवण्याबरोबरच शासकीय सेवा देणारे केंद्र म्हणून हे ठिकाण महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.
या प्रकल्पात वायुविजनास ( हवेशीर) अनुकूल अशा पद्धतीने बांधलेली आवारे, स्वागतकक्ष आणि मार्ग, स्थानिक आणि आधुनिक स्थापत्यशैलीचा संगम असलेले आकर्षक बांधकाम उर्जासंपन्न भव्य स्थापत्यशास्त्राचा वापर, सभोवतालच्या भव्य परिसरात सुसंगत असे विरूध्द दिशेने केलेले बांधकाम सर्व इमारती भोवती असलेली हरित स्थाने, लोकांना सहजपणे ये- जा करता यावी म्हणून प्रशस्त पदपथ, कडक उन्हाला अटकाव करण्यासाठी इमारतीवर डोम पध्दतीने छताची रचना, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाण्याचा पुनर्वापर यासाठी आधुनिक प्रांगणात नैसर्गिक जलस्त्रोत रोखण्यासाठी उभारण्यात आलेला जलप्रकल्प इमारतीच्या दर्शनी भागांमध्ये पराविर्तत होणाºया जीआरसीचा वापर ऊर्जाक्षम स्वयंचलित दिव्यांचा वापर एचव्हीएसी, विद्युत आणि पाणी सुविधांसाठी ऊर्जा कार्यक्षम साधनांचा वापर नैसर्गिक प्रकाशाचे अधिकाधिक परावर्तन व्हावे यासाठी भव्य फ्लोअर प्लेटसचा वापर ही ठळक वैशिष्ट्ये असणार आहेत.


प्रशस्त इमारती अन् हिरवेगार वातावरण हेच आकर्षण
बांधकामाच्या क्षेत्रफळा नुसार तळ मजला २ आरसीसीचे बांधकाम (अजून दोन मजल्याची भविष्यकालीन तरतूद ) भूखंडाचे क्षेत्रफळ : १८६८५८.५१ चौ. मी. एकूण बिल्ट अप क्षेत्र : ६६०५६.०८ चौ. मी.
अ) जिल्हाधिकारी कार्यालय इमारत : १५४८१.३९ चौ.मी.
ब) जिल्हा परिषद कार्यालय इमारत : १५४८१.३९ चौ. मी
क) पोलीस अधीक्षक कार्यालय इमारत : ३९०२.०२ चौ. मी.
ड) नवीन प्रशासकीय कार्यालय ब्लॉक - ए :१५७०९.८९ चौ.मी. इ) नवीन प्रशासकीय कार्यालय ब्लॉक - बी : १५४८१.३९ चौ. मी.अनुज्ञेय चटई निर्देशांक क्षेत्र : १ उपभोग्य चटई निर्देशांक क्षेत्र : ०.३९, एकूण खुले क्षेत्र : १६४७३५.६२ चौ. मी., प्रस्तावित हरित क्षेत्र : ७०७२९. ०८ चौ. मी. चा समावेश आहे. वाहनतळा मध्ये ७५४ कार २९६८ स्कूटर/मोटार सायकल तर २९८५ सायकल पार्किंगची व्यवस्था असून प्रकल्पाची किंमत (इमारती) : रु . १५०. ५८ कोटी.
बांधकामाचा दर : रु . २११८.५६ प्रती चौ. फूट असणार आहे या प्रकल्पाचे वास्तुशास्त्रीय आराखडे आणि अभियांत्रिकी कामे पालघर नवीन शहरे विकास प्राधिकरण सिडको व तिच्या सहकंपन्या पार पाडतील.

Web Title: Such will be the formation of the new marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.