अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस; महापालिकेने जवाबदारी ढकलली पोलिसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 11:23 PM2019-07-02T23:23:39+5:302019-07-02T23:23:52+5:30

पावसाळ्यापूर्वी पालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल महानगरपालिका दरवर्षी तयार करते.

The strange nature of a strange system is exposed; The municipal corporation took responsibility for the police | अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस; महापालिकेने जवाबदारी ढकलली पोलिसांवर

अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस; महापालिकेने जवाबदारी ढकलली पोलिसांवर

Next

नालासोपारा : गेल्या ४ दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे आणि पुण्यातील कोंढवा येथे सोसायटीच्या इमारतीची संरक्षक भिंत पडून १६ मजुरांच्या मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे वसईमधील धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतीचा मुद्दा ऐरणीवर असल्याने पावसाळ्यात कोणती तरी अनुकचित घटना घडेल म्हणून स्वत:ची जवाबदारी झटकून वसई विरार महानगरपालिकेच्या जी प्रभागाच्या सहायक आयुक्त सुभाष जाधव यांनी पोलिसांना लेखी नोटीस धाडून अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते.
पावसाळ्यापूर्वी पालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल महानगरपालिका दरवर्षी तयार करते. त्यानुसार धोकादायक इमारतींची तीन वर्गात वर्गवारी केली जाते. ज्या अतिधोकादायक इमारती असतात त्यांना तात्काळ खाली करायचे असते. पालिकेकडे संक्र मण शिबिर नसल्याने अद्याप एकाही अतिधोकादायक इमारतींच्या रहीवाशांना बाहेर काढून त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. अशा इमारतीमधील रहिवाशांची घरे खाली करून संक्र मण शिबिरामध्ये पुनर्वसन करण्याची सर्वस्वी जवाबदारी महानगरपालिकेकडे असते पण स्वत:ची जवाबदारी झटकून अनुकुचित प्रकार घडला तर महानगरपालिका जवाबदार राहणार नसून सर्वस्वी जवाबदारी पोलिसांची असल्याचे नोटीसीत नमूद केले आहे. वालीव प्रभागात ३७ धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतींच्या नावांच्या यादीची एक प्रत आणि नोटीसीसोबत महानगरपालिकेच्या अधिकाºयाांी वालीव पोलीस ठाण्यात सोमवारी धाडली आहे. यानोटिसीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी उत्तर पाठवले असल्याचेही सूत्रांकडून कळते. पावसाळ्यात धोकादायक इमारती केव्हाही कोसळू शकतात.

किती इमारती वसई तालुक्यात धोकादायक...
महानगरपालिकेने ५८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी १९८ अतिधोकादायक इमारती, सी वन मध्ये ८१ इमारती, सी टू मध्ये १९७ इमारती तर सी थ्रीमध्ये १११ इमारती अशी यादी मनपाने तीन गटात वर्गवारी केली आहे.
परंतु अद्यापही १९८ अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवासी रहात आहेत. या धोकादायक इमारतींमध्ये अजूनही शेकडो कुटुंब रहात आहेत.

धोकादायक किंवा अतीधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे व राहिवाशांना खाली करण्याची सर्वस्वी जवाबदारी महानगरपालिकेची आहे. घरे खाली करताना पोलीस बंदोबस्त पाहिजे असेल तर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार देण्यात येईल.
- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे

Web Title: The strange nature of a strange system is exposed; The municipal corporation took responsibility for the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.