बलात्काऱ्याला सुनावली जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:48 AM2018-05-06T06:48:28+5:302018-05-06T06:48:28+5:30

अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोपायाखाली बबलू शंभू यादव या नराधमास वसई न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एन. जी .प्रधान यांनी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली. गंभीर बाब म्हणजे त्याने ज्या अल्पवयीन पिडीतेसोबत हा प्रकार केला तिला उत्तरप्रदेशात नेऊन गर्भपात करवला असल्याचेही या खटल्यादरम्यान समोर आले आहे.

 Sentenced to life term for rapist | बलात्काऱ्याला सुनावली जन्मठेप

बलात्काऱ्याला सुनावली जन्मठेप

Next

पालघर - अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोपायाखाली बबलू शंभू यादव या नराधमास वसई न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एन. जी .प्रधान यांनी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली. गंभीर बाब म्हणजे त्याने ज्या अल्पवयीन पिडीतेसोबत हा प्रकार केला तिला उत्तरप्रदेशात नेऊन गर्भपात करवला असल्याचेही या खटल्यादरम्यान समोर आले आहे.
तो वसई येथे खाद्यगृह व्यवसाय चालवीत होता. या दरम्यान या पीडितेच्या आईशी त्याचे संबंध उत्तरप्रदेशातील त्याच्या गावात जुळले. तिच्या पतीपासून तिला ४ मुले आहेत. पतीची परिस्थिती वाईट असल्याने ती आपल्या मुलांसह तेथे विभक्त राहत होती. बबलू व तिचे संबंध जुळल्यानंतर त्याने तिला व तिच्या दोन मुलींना वसई येथे आणले व तो राहत असलेल्या ठिकाणी त्यांना ठेवले. तो त्यांचे पालनपोषण करणारा असल्याने त्या बबलूसोबत वसई येथील एका चाळीतील त्याचा खोलीत सोबत राहू लागल्या. त्यानंतर त्याची वाईट नजर मुलीवर पडली. त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या घटनेमुळे तिला गर्भधारणा झाल्याचे लक्षात येताच बबलूने तिला उत्तरप्रदेशात नेऊन तिथे गर्भपात करविला.त्यानंतर त्याने त्या मुलीला पुन्हा वसईत आपल्या राहत्या घरी आणले. या पीडितेच्या मोठ्या बहिणीसोबतही असेच करण्याच्या इराद्याने त्याने तिच्यासोबत ती घरात झोपली असताना छेड काढली व तिच्यासोबत तसाच प्रकार करण्यासाठी जबरदस्ती करू लागला. मात्र तिने यास नकार देऊन या घटनेची माहिती आपल्या आईला व आजूबाजूच्यांना सांगितली. त्यानंतर या दोन्ही मुलींच्या आईने वालीव पोलीस ठाण्यात डिसेंबर २०१४ ला तक्रार नोंदविली. बबलू यादव याच्याविरोधात पोलिसांनी पॉक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार सुनावणी होऊन ही सजा त्याला ठोठावण्यात आली.

१७ हजार रुपये दंडही ठोठावला

या प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक जी.बी.माळी व त्यांच्या सहकार्यांनी कशोशीचे प्रयत्न करून या प्रकरणातील दुवे शोधून भक्कम व सबळ पुरावे जमा करून दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले.या अनुषंगाने सरकारी वकील कादंबिनी खंडागळे यांनी वसई न्यायालयात बबलू यादव विरोधातील हा खटला २०१७ मध्ये सुरु केला. सरकारी वकील व वालीव पोलिस ठाण्याच्या भक्कम पुराव्यांमुळे पॉक्सो व इतर गुन्ह्याअंतर्गतचा आरोपी बबलू यादव यास शुक्र वारी वसई न्यायालयाने जन्मठेप व १७ हजार रु पये दंड अशी शिक्षा सुनावली. यातील फिर्यादी असलेली त्यांची आई गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयात आली आली नाही मात्र पोलिसानी तपासाअंती शोधलेले पुरावे,या दोन मुलींच्या सबळ साक्षीमुळे व वैद्यकीय अहवालानुसार या आरोपीस शिक्षा सुनावली गेली.

Web Title:  Sentenced to life term for rapist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.