वसई महापालिकेत गुजरात पासिंगची वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:58 AM2018-06-12T03:58:19+5:302018-06-12T03:58:19+5:30

वसई विरार महापालिकेच्या स्वच्छता विभाग अंतर्गत जी व एच प्रभाग परिसरातील कचरा उचलण्यासाठी गुजरात पासिंगच्या कचऱ्याच्या गाड्या महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्याने सर्वत्र पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होते आहे.

Passengers of Gujarat Passing Vehicles in Vasai Municipal Corporation | वसई महापालिकेत गुजरात पासिंगची वाहने

वसई महापालिकेत गुजरात पासिंगची वाहने

Next

वसई - वसई विरार महापालिकेच्या स्वच्छता विभाग अंतर्गत जी व एच प्रभाग परिसरातील कचरा उचलण्यासाठी गुजरात पासिंगच्या कचऱ्याच्या गाड्या महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्याने सर्वत्र पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होते आहे.
दरम्यान महापालिकेने मागणी केल्या नुसार ठेकेदाराने हव्या असलेल्या गाड्या या गुजरात मध्ये विविध बँकांनीे जप्त केलेल्या वा लिलावातून अर्ध्या किंमतीत खरेदी केलेल्या आहेत, याबाबत लिलावातून खरेदी केलेल्या गाड्या पालिकेत ठेका पद्धतीवर लावला असल्याचा खुलासा ठेकेदारांच्या वतीने विकी नाईक यांनी केल्याने आता पालिकेच हे पितळ उघडे पडले आहे. पालिकेच्या जी प्रभाग वालिव व एच प्रभाग ,नवघर माणिकपूर विभागात तब्बल छोट्या अशा १३ ट्रीप्पर कचरा गाड्या दाखल होऊन कार्यरत हि झाल्या आहेत, गोखिवरे व नवघर माणिकपूर म्हणजेच जी व एच स्वच्छता विभागात या दोन दिवसात सर्वत्र गुजरात पासिंगच्या गाड्या निदर्शनास आल्याने व काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या चर्चेला उधाण आले आहे.
एकूणच गाड्या गुजरात पासिंगच्या का? याबाबत पालिका प्रशासना कडून माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता यावर प्रभाग समिती कार्यालय ते थेट अतिरिक्त आयुक्त यांच्या पर्यंत कोणीही प्रतिक्रि या दिली नाही ठेका पद्धत जरी असली तरी पालिकेने नव्या
गाड्या लावण्यासाठी निविदा मागवल्या होत्या तर ठेकेदाराने मात्र लिलावातून खरेदी केलेल्या जुन्या गाड्या लावल्याचे स्पष्ट झाल्याने ही फसवणूक असल्याचे उघड झाले
आहे.

आम्ही गुजरात मध्ये बँकेने जप्त केलेल्या जुन्या गाड्या लिलावातून खरेदी करून पालिकेला पुरवल्या आहेत, पालिकेच्या मागणीनुसार त्यांनी हा ठेका मंजूर केला असून साधारण १३ ते १४ गाड्या आहेत नवीन गाडीची किंमत ५ लाख आहे मात्र जुनी गाडी अडीच लाख रुपयापर्यंत जाते. त्या गुजरात पासिंग आहेत मात्र आम्ही आता महाराष्ट्र पासिंग साठी आरटीओ कडे नोंदणीसाठी पाठपुरावा करत आहोत.
-विकी नाईक, ठेकादार,कंपनी मेसर्स,
रिलायबल इंटरप्रायझेस

त्या गाड्या कोणत्या राज्याच्या पासिंग असाव्यात अथवा असू नये असे तांत्रिक काही आहे का हे पाहण्यासाठी मला टेंडर नियमावली पाहावी लागेल. -माधव जवादे, शहर अभियंता ,वसई विरार महापालिका मुख्यालय

Web Title: Passengers of Gujarat Passing Vehicles in Vasai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.