खासदारांच्या वसईतील जनता दरबारात वीजेने केला खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:53 PM2019-06-15T23:53:14+5:302019-06-15T23:53:43+5:30

जनता दरबार सुरू असतांना तीनवेळा वसई गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने वीज कंपनी व त्यांच्या अधिकाऱ्यांची पोल चांगलीच उघडी पडली.

MPs at the public rally in the Vasan court | खासदारांच्या वसईतील जनता दरबारात वीजेने केला खेळखंडोबा

खासदारांच्या वसईतील जनता दरबारात वीजेने केला खेळखंडोबा

Next

वसई : पालघर लोकसभेचे युतीचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्र वारी वसई तहसील कार्यालयात आपला पहिला-वहिला जनता दरबार आयोजित केला होता. मात्र आश्चर्य म्हणजे हा जनता दरबार सुरू असतांना तीनवेळा वसई गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने वीज कंपनी व त्यांच्या अधिकाऱ्यांची पोल चांगलीच उघडी पडली.

दरम्यान या जनता दरबारात लोकांनी प्रामुख्याने वीज बिले, वाढीव बिले, अधिकारी कर्मचारी वर्गाचा अनागोंदी व मनमानी कारभार आदी असंख्य वीज समस्या सोबत प्रलंबित ६९ गावांचा पाणीपुरवठा प्रश्न: यासह वसई महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्न त्यांच्या समोर मांडले. उपस्थित विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यावरील उपाययोजना सुचविली.

खरंतर या जनता दरबारात महसूल, वीज आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेली ६९ गावची पाणी योजना हे प्रमुख प्रश्न होते.ते दुर्लक्षित राहिले.
त्यावर खास.राजेंद्र गावित यांनी उपस्थितांना ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेउन कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन लवकरच हा पाणी प्रश्न निकाली लागणार असल्याचे सूतोवाच केले.

या दरबाराचे महत्त्व वाढले. कारण येथे अवघ्या ४ महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूका होत असून पैकी पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात युतीला चांगले मताधिक्य मिळून आता युतीचे खासदार निवडून आले, त्यामुळेच सेना भाजपाचे लक्ष आता खासकरून बोईसर, नालासोपारा आणि वसई विधानसभा क्षेत्रावर राहणार आहे.

वीज अधिकारी वर्गाची फटफजिती ! तर पालिका आयुक्त उठून जातात तेव्हा ?
हा जनता दरबार सुरू असताना देखील याप्रसंगी तीन वेळा महावितरणचा विद्युत प्रवाह खंडित झाला, त्यामुळे उपस्थित महावितरणच्या अधिकाºयांची चांगलीच फटफजिती बघायला मिळाली. याचा फायदा घेत नागरिकांनी आरडाओरड सुरू केला होता. तर यावेळी उपस्थित नागरिकांनी सार्वजनिक प्रश्नासमवेत वसई विरार महापालिका आयुक्त बी.जी.पवार यांना आपले खाजगी प्रश्न देखील विचारायला सुरुवात करून त्यांना घेरण्याचा प्रत्यन केला. मात्र अखेर वैतागून आयुक्त बी.जी. पवार यांनी भर सभेतून काढता पाय घेत निघून जाणे पसंत केलं.

Web Title: MPs at the public rally in the Vasan court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.