भाजपा-सेनेतच टक्कर, मोदीलाट रोखणार कशी? साम, दाम, दंड, भेद अस्त्रांनी शिवसेना जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 06:21 AM2017-12-02T06:21:25+5:302017-12-02T06:21:31+5:30

पहिल्यांदाच होणा-या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीला शिवसेना भाजपा स्वतंत्रपणे सामोरे जात असतांना शिवसेनेची दमछाक होतांना दिसत आहे. एकीकडे पालमंत्र्यानीं गत पंचविसवर्षांच्या कार्यकाळात काही भरीव केले नसले तरी मोदी लाट कायम असल्याचे वारे वाहत असल्याने ती रोखावी कशी असा आव्हान सेना नेत्यांपुढे आहे.

How to prevent a BJP-style collision, how can he stop the ModiLat? Sena, price, punishment, discrimination by Shiv Sena Giris | भाजपा-सेनेतच टक्कर, मोदीलाट रोखणार कशी? साम, दाम, दंड, भेद अस्त्रांनी शिवसेना जेरीस

भाजपा-सेनेतच टक्कर, मोदीलाट रोखणार कशी? साम, दाम, दंड, भेद अस्त्रांनी शिवसेना जेरीस

Next

 वाडा : पहिल्यांदाच होणा-या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीला शिवसेना भाजपा स्वतंत्रपणे सामोरे जात असतांना शिवसेनेची दमछाक होतांना दिसत आहे. एकीकडे पालमंत्र्यानीं गत पंचविसवर्षांच्या कार्यकाळात काही भरीव केले नसले तरी मोदी लाट कायम असल्याचे वारे वाहत असल्याने ती रोखावी कशी असा आव्हान सेना नेत्यांपुढे आहे.
गेल्या दोन तीन वर्षामध्ये सर्वच राजकीय पक्षातील चांगले कार्यकर्ते भाजपाने गळाला लावल्याने त्यांची ताकद निश्चितच वाढली आहे. तसेच, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे वाड्यातील रहिवासी असून त्यांची कन्या निशा सवरा ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असल्याने सवरा आपली पूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आहे. त्यातच भाजपाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा अवलंब होणार असल्याने सेनेच्या तंबूमध्ये चिंतेच्या छटा आहेत.
एकंदर पांढरपेशीवर्ग हा गप्प राहून भाजपाला मतदान करेल असा आत्तापर्यंतचा कल असलातरी नोटबंदी, जीएसटीचे चटके लागल्याने हा वर्ग मतपेटीत काय टाकेल या बाबतही संभ्र्रम आहे.
बदलत्या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी हे एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर कॉग्रेस, सी.पी.एम., मनसे व शेकाप या पक्षांची एकत्र मोट बांधली गेली तरीही त्यांची ताकद भाजपा व शिवसेना यांच्या पुढे जाईल का? यावर खल सुरु आहेत. सेना-भाजपा वगळता सर्वांसाठी अस्तित्वाची लढाई आहे.

वाड्यात काँग्रेसकडून देवांना साकडे, प्रचाराचे रणशिंग फुंकले

च्वाडा : येथील नगरपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेसने शुक्र वारी काँग्रेस भवनासमोरील गणेश मंदिरात नारळ वाढवून प्रदेश प्रभारी सुभाष कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराला सुरु वात केली. या निवडणुकीत काँग्रेसने सेनेच्या बंडखोर उमेदवार सायली पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.

च्नगरसेवकपदाच्या १७ पैकी १२ जागांवर उमेदवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवित असून उर्वरित जागांवर मनसे व अपक्षासोबत आघाडी केली आहे. शुक्रवारी ग्रामदैवतांसह अन्य मंदिरामध्ये जाऊन उमेदवारांनी दर्शन घेतले. त्याचप्रमाणे परळीनाका येथील दर्ग्यावर चादर चढवून काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

च्सपुर्ण शहरात काढलेल्या रॅलीमध्ये काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष केदार काळे, माजी खासदार दामोदर शिंगडा, ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे, प्रदेश चिटणीस मनिष गणोरे, अल्पसंख्यक सेलचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मेमन, उपाध्यक्ष इरफान सुसे, तालुकाअध्यक्ष दिलीप पाटील, तालुका अध्यक्षा दर्शना भोईर उपस्थित होत्या.

Web Title: How to prevent a BJP-style collision, how can he stop the ModiLat? Sena, price, punishment, discrimination by Shiv Sena Giris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा