पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 09:12 AM2024-05-07T09:12:18+5:302024-05-07T09:13:18+5:30

राहुल गांधींच्या भंडारा-गोंदिया, अमरावती, सोलापूर आणि पुणे या चार मतदारसंघांसाठी सभा झाल्या होत्या.

Kharge of Congress in the next stages, relying on Priyanka; Rahul Gandhi has no more scheduled meetings in Maharashtra | पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही

पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही

- दीपक भातुसे  
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्रातील प्रचारावर लक्ष केंद्रित केले असताना शेवटच्या दोन टप्प्यांत महाराष्ट्रातील प्रचारासाठी काँग्रेसची भिस्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी यांच्यावर राहणार आहे. अखेरच्या दोन टप्प्यांत राहुल गांधींची एकही सभा महाराष्ट्रात होणार नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली.  

राहुल गांधींच्या भंडारा-गोंदिया, अमरावती, सोलापूर आणि पुणे या चार मतदारसंघांसाठी सभा झाल्या होत्या. तर प्रियांका गांधींची लातूरला सभा झाली होती. 
उरलेल्या टप्प्यांसाठी प्रियांका गांधींची सभा १० मे रोजी नंदुरबारला आणि खरगेंची एक सभा १५ मे रोजी मुंबईत होत आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसाठी  मतदान होणार आहे. मात्र राहुल गांधींची एकही सभा मुंबईत होणार नाही. 

प्रतिष्ठेच्या लढाईवर लक्ष केंद्रीत 
गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून यावेळी राहुल गांधी निवडणूक रिंगणात उतरले आहेत, तर अमेठीतून किशोरी लाल शर्मा निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागा गांधी घराण्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. 
या दोन्ही मतदारसंघांतील प्रचाराची धुरा प्रियांका गांधींनी हाती घेतली आहे. राहुल गांधी स्वतः रायबरेलीत लढत असल्याने अखेरच्या टप्प्यात त्यांना तिथे लक्ष केंद्रीत करावे लागेल. अमेठी आणि रायबरेलीसाठी पाचव्या टप्प्यात २० मेरोजी मतदान होत आहे.     

शेवटच्या दोन टप्प्यांत काँग्रेसचे सहा उमेदवार   
nजागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला १७ मतदारसंघ आले. 
nयातील पहिल्या तीन टप्प्यांत २४ पैकी ११ मतदारसंघ काँग्रेसकडे होते. 
nतर पुढील दोन टप्प्यांत मतदान होणाऱ्या २४ पैकी सहा मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार आहेत. 
nयात नंदुरबार, धुळे, जालना, पुणे, 
मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर यांचा समावेश आहे.

आतापर्यंत चार ठिकाणी घेतल्या सभा   
nराहुल गांधी यांच्या राज्यात चार सभा झाल्या आहेत. यात भंडारा-गोंदिया, अमरावती, सोलापूर आणि पुणे या मतदारसंघांचा समावेश आहे. 
nपुण्यातील सभा पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चार मतदारसंघांसाठी एकत्रित घेण्यात आली होती. 
nतर प्रियांका गांधींची लातूरमध्ये जाहीर सभा झाली होती. त्यानंतर आता नंदुरबार येथे प्रियांका गांधींची जाहीर सभा होणार आहे.    

Web Title: Kharge of Congress in the next stages, relying on Priyanka; Rahul Gandhi has no more scheduled meetings in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.