सर्व्हर डाऊन, कर्जमाफीचा अर्ज करावा कसा? तत्काळ उपाययोजना करण्याची शेतक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:12 AM2017-08-24T03:12:23+5:302017-08-24T03:12:26+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे आॅनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

How to apply for a loan down, down the server? Farmers' demand for immediate solution | सर्व्हर डाऊन, कर्जमाफीचा अर्ज करावा कसा? तत्काळ उपाययोजना करण्याची शेतक-यांची मागणी

सर्व्हर डाऊन, कर्जमाफीचा अर्ज करावा कसा? तत्काळ उपाययोजना करण्याची शेतक-यांची मागणी

Next

बोर्डी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे आॅनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र पालघर जिल्ह्यात सर्व्हरडाउन होत असल्याने शेवटच्या घटकाला अर्ज दाखल करण्यात येणा-या अडचणी येत आहेत. दरम्यान तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
राज्य शासनाने शेतकºयांना एक लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा आहे. शेतकºयांनी अर्जातील आधार क्र मांक, मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड, पत्नीची माहिती, उत्पन्न आदी नोंदी भराव्या लागतात. त्यानंतर थंब मशीनद्वारे उमटणारी प्रिंट घेऊन लॉग इन करावे लागते. मात्र सर्व्हर डाउन होण्याची समस्या डहाणूसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात भेडसावत आहे. त्यामुळे काही वेळेला एक अर्ज भरून घेण्यासाठी अनेक तासांचा अवधी असल्याने दिवसागणिक खूपच कमी अर्ज भरले जातात. त्यामुळे कामाचा खोळंबा होऊन ताटकळत बसावे लागल्याने शेतकरी राजा वैतागला आहे. उत्सवाचे दिवस असल्याने रोज घराबाहेर पडणे शक्य नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.
डहाणू तालुक्यातील ३८ महा ई सेवा केंद्र आणि ८० कॉमन सर्व्हीस सेंटरमध्ये सारखीच परिस्थिती आहे. ग्रामपंचायतीला फॉर्म भरून घेण्याचे निर्देश असतांना तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींमध्ये ही सुविधा सुरू नसल्याने शेतकºयांना अन्य ठिकणी भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीकडून ही सेवा तत्काळ सुरू व्हावी, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
सहकार आणि पणनमंत्री सुभास देशमुख यांनी शेवटच्या घटकाला येणाºया समस्या सोडविण्यासाठी स्थानिक अधिकाºयानी लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबाजवणी न झाल्यास १५ सप्टेंबरची वाढीव मुदत उलटूनही अनेक वंचित राहण्याची शक्यता आहे.

काही सायबर कॅफे चालकांनी हा फॉर्म भरून घेण्यासाठी शेतकºयांकडून जादा पैसे उकळण्यास सुरु वात केली आहे. शिवाय महा ई सेवा आणि कॉमन सर्व्हिस सेंटरना भेडसाविणारी सर्व्हर डाऊनची समस्या सायबर कॅफे चालकांना का होत नाही? याची शहानिशा जिल्हाधिकाºयांनी करणे आवश्यक आहे.
- गौरव पाटील,
महा ई सेवा केंद्रचालक

Web Title: How to apply for a loan down, down the server? Farmers' demand for immediate solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.