फा. मायकल यांना बँकेचे सभासदत्व द्या! फादर मायकेल यांची सहकार आयुक्तांकडे अपील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:05 AM2018-09-02T00:05:06+5:302018-09-02T00:05:55+5:30

धर्मगुरु ंना सभासदत्व देण्याचे बँकेचे धोरण नाही, असे लेखी कळवून बॅसीन कॅथॉलिक बंँकेच्या धोरणा विरोधान फादर मायकेल यांनी सहकार आयुक्तांकडे अपील करून दाद मागितली होती.

Father Michael Appeal to Co-op Commissioner | फा. मायकल यांना बँकेचे सभासदत्व द्या! फादर मायकेल यांची सहकार आयुक्तांकडे अपील

फा. मायकल यांना बँकेचे सभासदत्व द्या! फादर मायकेल यांची सहकार आयुक्तांकडे अपील

Next

वसई : धर्मगुरु ंना सभासदत्व देण्याचे बँकेचे धोरण नाही, असे लेखी कळवून बॅसीन कॅथॉलिक बंँकेच्या धोरणा विरोधान फादर मायकेल यांनी सहकार आयुक्तांकडे अपील करून दाद मागितली होती. त्यावर तब्बल आठ सुनावण्या घेत देत सहकार आयुक्तांनी फादरांना एक महिन्यात बँकेचे सभासदत्व देण्याचा आदेश बँकेला दिला आहे.
निवृत्त धर्मगुरू आणि समाजशुद्धी अभियानाचे प्रमुख फा. मायकल यांना बॅँकेचे सभासदत्व मिळावे यासाठी त्यांनी २०१०, जुलै २०१६ व आॅक्टोबर २०१७ मध्ये रितसर कागदपत्रे आणि दीड हजार रु पये जमा करून अर्ज केला होता. मात्र, बँकेने त्यास नकार दिला होता.त्या विरोधात अपीलामध्ये फादरांकडून आपण भारतीय असल्याने बँकेकडून नाकारण्यात आलेले सभासदत्व हे घटनेचे अवमान करणारे आहे तसेच आपला अर्ज हा बँकेच्या बोर्ड मिटिंग मध्ये विचारात घेतला गेला नसल्याने म्हटले होते. त्यावर बँकेकडून आपल्या बँकेच्या नियमात असा उल्लेख असल्याने तसेच फादरांना कुठल्याही कर्जाची आवश्यता नसल्याने आपण त्यांना सभासदत्व नाकारल्याचे म्हटले आहे. पुढे फादरांकडून बँकेची वेळोवेळी बदनामी केली जात असल्याने बँकेच्या प्रतिमेला धोका निर्माण होत असल्याचेही म्हटले आहे. बँकेकडून ख्रिती कॅनन कायदा तसेच वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांचा धार्मिक मासिक सुवार्ता मधील लेखाचा वापर केला गेला होता. यावर आयुक्तांनी ऐतिहासिक निर्णय देत बँकेकडून करण्यात आलेले सर्व दावे हे सहकार कायदा कलम २२ व २३ मध्ये बसत नसल्याने पूर्ण खोडून काढले तसेच बँकेने आखलेल्या नियमांचा समाचार घेतला. बँकेकडून आखण्यात आलेले कायद्यात कायदेशीरपणा नसून सहकार कायद्याखाली बँक येत असल्याने सहकार कायदा महत्त्वाचा ठरतो. त्यात फादरांना कर्जाची आवश्यता आहे की नाही ही त्यांची खाजगी बाब आहे त्यामुळे त्यांना सभासदत्व देऊ नये हे योग्य नाही. यावेळी त्यांना १२ सप्टेंबर पर्यंत सभासदत्व द्यावे असा आदेश दिला आहे.

बँक निर्णयाचा सन्मान करून फादरांना सभासदत्व देईल. बोर्ड मिटींगमध्ये याचा ठराव घेतला जाईल. बँकेला एक महिन्याचा अवधी मिळाला आहे.
- ओनील अल्मेडा,
अध्यक्ष, कॅथॉलिक बँक.

प्रत्येक सुनावणीला बँक अधिकारी व वकील सोबत धर्म कायदा घेऊन येते याचे वाईट वाटते. त्याजागी सहकार कायद्याच्या प्रत आणणे गरजेचे होते. सल्लागारांनी बॅँकेची दिशाभूल केली. पोप फ्रान्सिस सांगतात की कुठल्याही देशाचा कायदा हा धर्मापेक्षा मोठा असतो.
- फादर मायकल

बँक अधिकारी स्वत:ला मालक समजायला लागले की, असे प्रकार घडतात. त्याला आळा तेव्हाच लागतो जेव्हा एखादी व्यक्ती किंवा सभासद सहकार आयुक्तांकडे दाद मागतो.
- अ‍ॅड. जिम्मी घोन्साल्विस, सभासद.

Web Title: Father Michael Appeal to Co-op Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.