डहाणू बोट दुर्घटना : ‘त्या’ १४५ शूरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 06:57 AM2018-01-30T06:57:37+5:302018-01-30T06:57:52+5:30

नुकत्याच डहाणूच्या समुद्र किना-यानजीक बोट उलटून झालेल्या अपघातात बचावकार्य करणा-या १४५ जणांचा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आनंद ठाकूर, डहाणूचे आमदार पास्कल धनारे, पालघर मतदार संघाचे आमदार अमित घोडा, डहाणू नगराध्यक्ष भरत राजपूत आदि उपस्थित होते.

Dahanu boat accident: 'those' 145 heroes felicitated | डहाणू बोट दुर्घटना : ‘त्या’ १४५ शूरांचा सत्कार

डहाणू बोट दुर्घटना : ‘त्या’ १४५ शूरांचा सत्कार

Next

- शौकत शेख
डहाणू - नुकत्याच डहाणूच्या समुद्र किनाºयानजीक बोट उलटून झालेल्या अपघातात बचावकार्य करणाºया १४५ जणांचा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आनंद ठाकूर, डहाणूचे आमदार पास्कल धनारे, पालघर मतदार संघाचे आमदार अमित घोडा, डहाणू नगराध्यक्ष भरत राजपूत आदि उपस्थित होते.
डहाणू तालुका विकास परिषद, पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद, डहाणू एज्युकेशन ट्रस्ट, इंडियन मेडिकल असोसिएशन, डहाणू जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. प्रकाश करंदीकर होते. यावेळी बोट दुर्घटनेत जीवाची पर्वा न करता बचावकार्य करणाºया सर्व शूरांना आयोजकातर्फे तसेच पोलीस प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र, शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरव विरांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी असलेल्या शापूर सालकर सह उप विभागीय पोली अधिकारी सचिव पांडकर यांचा देखिल समावेश होता. यावेळी डहाणू तालुका विकास परिषदेचे निमंत्रक तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव जोशी, इंडियन मेकल असोसिएशन डहाणू शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक कांबळे, डहाणू इंडस्ट्रिजचे अध्यक्ष सतिष पारेख, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष शंकरसिह राजपूत, जैन सोशल गृपचे अध्यक्ष शैलेश राकामुथा, माजी अध्यक्ष रविंद्र राऊत, उपविभागीय पोली अधिकारी सचिन पांडकर, पोलीस निरिक्षक सुदाम शिंदे उपस्थित होते.

स्वत:ला झोकून दिले

१३ जानेवारी रोजी डहाणू समुद्र किनाºया जवळच असलेल्या बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात एक किलोमीटर अंतराच्या जवळपास बोट जाऊन ती उलटली. हा प्रकार काही लोकांच्या डोळ्या देखत घडला.
छायाचित्रकार सनत तन्ना यांनी बोट उलटल्याची माहिती फेसबूकवर पोस्ट करुन मदतीचे आव्हान केले. त्यानंतर अनेक तरुण, मासेमारी नौका व मच्छिमारांनी घटनास्थळी पोहचून केलेल्या मदत कार्यामुळे २७ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत तीन विद्यार्थीनी मुत्यूमुखी पडल्या होत्या. त्यावेळी खवळलेल्या समुद्रात स्वत:ला झोकून मतदकार्य करण्यात आले.

Web Title: Dahanu boat accident: 'those' 145 heroes felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.