प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटींचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:28 AM2018-04-19T02:28:39+5:302018-04-19T02:28:39+5:30

संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी दि.१२, गुरुवारपासून कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कार्यालयात उपस्थिती लावली होती.

Contractual contract for pending demands | प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटींचा संप

प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटींचा संप

Next

जव्हार: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी महासंघाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून सोमवारी जव्हार तालुक्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड याना निवेदन देऊन संप पुकारण्यात आला.

संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी दि.१२, गुरुवारपासून कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कार्यालयात उपस्थिती लावली होती. तसेच मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असे पत्राद्वारे इशारा देण्यात आला होता. त्यांच्या मागण्यांचा विचार करण्यात यावा म्हणून येथील ६० ते ७० अधिकारी व कर्मचाºयांनी आपले निवेदन दिले आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्याचे स्वरूप म्हणजे काम करीत असलेल्या कोणत्याही कंत्राटी कर्मचाºयास काढण्यात येऊ नये, शासन सेवेत कायम करा व शासन सेवेत कायम होईपर्यंत समान काम समान वेतन लागू करा, कर्मचाºयास विमा संरक्षण, आशा कार्यकर्ती आणि आशा गट प्रवर्तक याना शासनाच्या न्यूनतम मानधन तत्त्वानुसार फिक्स मासिक वेतन देण्यात यावे. आदी मागण्यांचे निवेदन वैधकीय अधीक्षक डॉ. मराड यांना देण्यात आले. ‘‘आम्ही काम बंद केले असले तरी तात्काळ सेवा बंद पडू नये म्हणून बाल चिकित्सा व एन एच आर विभाग सुरू ठेवण्यात आल्याचे शैलेश बेदडे यांनी सांगितले.

Web Title: Contractual contract for pending demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.