पांढरा कांदा ठरतोय म्हसरोली गावाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:56 AM2019-04-23T00:56:47+5:302019-04-23T00:56:50+5:30

१२० शेतकऱ्याची २०० ते २५० एकरवर लागवड; प्रयोगशिल शेतकºयाकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष

The base of Mhasroli village, due to white onion | पांढरा कांदा ठरतोय म्हसरोली गावाला आधार

पांढरा कांदा ठरतोय म्हसरोली गावाला आधार

Next

- राहुल वाडेकर

विकमगड : या तालुक्यातील शेतीक्षेत्रात विविध प्रयोग सुरु असून त्यामुळे पालघर जिल्हात हा तालुका कृषी केंद्रबिंदू ठरू पाहत आहे. फुलशेतीमध्ये मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडु, सूर्यफुल, तूती लागवड त्याचबरोबर हळद, भाजीपाला लागवड केली जात आहे. आता यापुढे पाऊल टाकून नगदी पिकांकडे लक्ष केंद्रीत करुन बाजारात अधिक उत्पन्न देईल त्याकडे शेतकºयाचा क ल दिसून येत आहे.

तालुक्यातील म्हसरोली या गावात पाच ते सहा वर्षापासून खरीपातील भातपीक कापणीनंतर डिसेंबरमधे पांढºया कांद्याची लागवड केली जात आहे. त्याला वाढती मागणी असून चांगली किंमतही मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत गावातील शेतकऱ्यांकडून त्याची लागवड मोठयÞा प्रमाणात केली जाऊ लागली आहे. विक्र मगड तालुक्यापासुन जवळ असलेल्या मुंबई, वसई-विरार, पालघर, नालासोपारा, भार्इंदर या शहरांतून या कांद्याला होणारी मागणी लक्षात घेऊन म्हसरोली गावातील शेतकरी अधिक प्रमाणात त्याची लागवड करू लागले आहेत. या गावात १२० शेतकºयानी या वर्षी २०० ते २५० एकरावर पांढºया कांद्याची लागवड केली आहे. त्यातून यावर्षी जवळपास १ लाख टन कांद्याचे उत्पादन या एका गावातून येणार असल्याचे शेतकरी सांगतात.

पारंपरिक शेतीला फाटा देऊन यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सेंद्रिय खते, दर्जेदार बियाणे, पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. यामुळे एकरी वीस टन एवढे विक्रमी उत्पादन घेण्यास मदत होऊ शकणार आहे. चांगल्या प्रतिचा कांदा उत्पादित झाल्यास त्याला प्रतिमाळ ९० ते १०० रुपये इतका चांगला दर शेतकºयांना मिळू शकेल, असा विश्वास सुनील रामु नडगे या कांदा लागवड शेतकºयाने व्यक्त केला आहे.

म्हसरोली गावातील शेतकरी राजेंद्र मधुकर भोईर यानी डिसेंबर महिन्यात दीड एकरावर पांढºया कांद्याची लागवड केली असून त्याना लागवडी पासून ते कांदा काढण्यापर्यंत ३५ ते ४० हजाराचा खर्च आला आहे. चार महिन्यात त्याना खर्च वजा करता १ लाख रु पये उत्पन्न मिळेल अशी आशा त्यानी व्यक्त केली. तर या गावात जगदीश रामू बेंदर, सुनील रामू नडगे, अनिल गोविंद बेंदर, बालु बेंदर अशा गावातील १२० शेतकºयानी २०० ते २५० एकर वर लागवड केली आहे. त्यातून या गावात १ लाख टन उत्पादन येईल असे शेतकºयानी सांगितले.

पांढºया कांद्याचे औषधी गुणधर्म
जर सर्दी किंवा कफाचा विकार असेल तर ताज्या कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास तो दूर होते. रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते हे मधुमेह रोगावर परिणाम करते. कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अ‍ॅसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते.

Web Title: The base of Mhasroli village, due to white onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.