दापचरीनाक्यावर संशयितास अटक, भिलाडला १०० तर येथे गोळा होतात ४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:12 AM2018-09-29T04:12:25+5:302018-09-29T04:12:35+5:30

तलासरी येथील तपासणी नाक्यावर वाहन पास करणाऱ्या टोळ्यांबरोबरच संशयीत लोकांचा वावर वाढला आहे.

The arrest of the suspect on Dachchiranak, Bhilad, 100, collects around 4 crore | दापचरीनाक्यावर संशयितास अटक, भिलाडला १०० तर येथे गोळा होतात ४ कोटी

दापचरीनाक्यावर संशयितास अटक, भिलाडला १०० तर येथे गोळा होतात ४ कोटी

Next

- सुरेश काटे 
तलासरी -  येथील तपासणी नाक्यावर वाहन पास करणाऱ्या टोळ्यांबरोबरच संशयीत लोकांचा वावर वाढला आहे. बुधवारी रात्री तलासरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तपासणी नाक्यावर रात्रीच्या अंधारात संशयास्पद फिरत असलेल्या मन्सुर हक खान याला अटक करण्यात आली. त्याची न्यायालयाने १५ हजाराच्या जामिनावर मुक्तता केली.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर दापचरी येथे असलेला तपासणी नाक्यावर अवजड वाहने पास करणाºया परप्रांतियांच्या टोळ्या कार्यरत असून अधिकाºयांच्या आशीर्वादाने ते अवजड वाहने पास करतात त्याचा वावर तपासणी नाक्यावर दिवसरात्र असतो तसेच येथील अधिकाºयांच्या दिमतीला त्याची खाजगी माणसेही असतात त्यांना अधिकारी कोड भाषेत पंटर म्हणतात.
हे पंटर येथून जाणाºया वाहनचालकांकडून अधिकाºयांच्या सहमतीने पैसे घेतात त्याला वाहन चालक एन्ट्री म्हणतात. ही एन्ट्री दिल्याशिवाय वाहन तपासणी नाक्यावरून पुढे जाऊ शकत नाही ती न देणाºया वाहन चालकाला हे पंटर लोक दमदाटी करतात वेळप्रसंगी मारहाणही करतात पण राजकीय व शासकीय वरदहस्त लाभल्याने याबाबत आवाज उठत नाही.
परराज्यातून आलेला वाहनचालक भानगड नको म्हणून तक्रारही करीत नाही त्यामुळे तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर येथे दिवस रात्र आहे पण याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचा उद्योग पुन्हा सुरू झाला. यावेळी वाहने पास करणाºया टोळ्यातील निझामाउद्दीन मन्सूरहक खान हा अंधारात संशयास्पद फिरत असलेल्या तरु णास ताब्यात घेण्यात आले.

मासिक ९६ कोटीं हडप?

गुजरात मधील भिलाड येथील तपासणी नाक्यावर मासिक १०० कोटींचा महसूल जमा होतो तर दापचरी येथे मासिक फक्त ४ कोटींचा महसूल जमा होतो. यात मोठा भ्रष्टाचार होतो असा दावा नरेंद्र मोदी यांनीच गेल्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात केला होता.

Web Title: The arrest of the suspect on Dachchiranak, Bhilad, 100, collects around 4 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.