तीन गावांत जलसंकट गडद; धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 09:58 PM2019-04-18T21:58:07+5:302019-04-18T21:59:24+5:30

देवळी तालुक्यातील नाचणगाव, पुलगाव व गुंजखेडा या तिन्ही गावांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचे पात्रही कोरडे पडल्यामुळे निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडा व पाणी साठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या तिन्ही गावातील नागरिकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Water conservation in three villages; Release the dam's water | तीन गावांत जलसंकट गडद; धरणाचे पाणी सोडा

तीन गावांत जलसंकट गडद; धरणाचे पाणी सोडा

Next
ठळक मुद्देनागरिकांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : देवळी तालुक्यातील नाचणगाव, पुलगाव व गुंजखेडा या तिन्ही गावांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचे पात्रही कोरडे पडल्यामुळे निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडा व पाणी साठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या तिन्ही गावातील नागरिकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नाचणगांव, पुलगांव व गुंजखेडा हे तिन्ही गावे वर्धा नदीच्या तिरावर वसलेले आहे. या तिन्ही गावांना याच नदीतून पाणी पुरवठा केल्या जातो.पण, सध्या नदीपात्र कोरडे असल्यामुळे तिन्ही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दिवसेंदिवस पाणी समस्या तीव्र होत असल्यामुळे निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडावे तसेच ते पाणी साठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गावकºयांनी निवेदनातून केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन आमदार रणजित कांबळे यांनाही देण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना काँगसचे पुलगाव शहरअध्यक्ष रमेश सावरकर, गुजखेडाच्या सरपंच वहिदा शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद वंजारी, देवळी पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसू, नागचणगावचे माजी सरपंच शब्बीर पठाण, माजी नगरसेवक देवकांत सहारे, पंचायत समिती सदस्य अशोक इंगळे, नाचणगावचे उपसरपंच सुरेश देवतळे, देविदास आसोले व गुंजखेडाचे उपसरपंच चंद्रकांत कांबळे यांची उपस्थित होते.

Web Title: Water conservation in three villages; Release the dam's water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.