पुलगाव पोलिसांची वॉशआऊट मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:46 PM2019-03-04T21:46:28+5:302019-03-04T21:46:47+5:30

पुलगाव येथून जवळच असलेल्या वायफड पारधी बेड्यावर येथे पुलगाव पोलिसांनी छापा घालून दारू साहित्य व मोहा सडवा नष्ट करण्यात आला.

Washout campaign of Pulgaon police | पुलगाव पोलिसांची वॉशआऊट मोहीम

पुलगाव पोलिसांची वॉशआऊट मोहीम

Next
ठळक मुद्देवायफड पारधी बेडा : ७३ हजारांचा मोहा सडवा केला नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आ.) : पुलगाव येथून जवळच असलेल्या वायफड पारधी बेड्यावर येथे पुलगाव पोलिसांनी छापा घालून दारू साहित्य व मोहा सडवा नष्ट करण्यात आला.
आगामी होळी सण व ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता पोलिस ठाण्याच्या हद्दीत शांतता राहावी याकरिता पुलगाव पोलिसांनी वायफड येथील पारधी बेड्यावर छापा घातला. यावेळी वायफड पारधी बेड्यावरील लोखंडी ड्रममधील मोहा सडवा, रसायन, गावठी मोहा दारू आणि दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ७३ हजार ४०० रुपयांचा माल नष्ट करण्यात आला. या प्रकरणात कमलाकर बाबाराव भोसले याला अटक करण्यात आली. इतर दोन आरोपी पसार झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पुलगावचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, सय्यद अहफाज, पोलीस उपनिरीक्षक शाही, उपनिरीक्षक मराठे, राऊत, जमादार मुजबैले, भांडारकर, बन्सोड, भोवरे, भोयर, गुजर, उईके, सहारे, सहाकाटे व इतर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. होळी सणाकरिता दारूची मोठी वाहतूक होते. पोलिसांनी या दरम्यान पोलिसांनी धडक मोहीम राबविण्याची अपेक्षा नागरिकांतून केली जात आहे.
बेड्यावर जाणारा ४५ पोती गूळ जप्त
समुद्रपूर- मिळालेल्या गोपनीय माहितीवरून स्थानिक पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने घटनास्थळी सापळा रचून दोन कारवाई केल्या. या दोन्ही कारवाईत कोल्ही व गणेशपूर पारधी बेडा येथे अवैध गावठी मोहा दारूची निर्मिती करण्याकरिता कमी प्रतीच्या गुळाची पोघी घेऊन जाताना दोन जणांना अटक करण्यात आली. यावेळी दोन चारचाकी व एक मालवाहू वाहनही जप्त करण्यात आले. मालवाहू गाडी क्र. एमएच ३२, क्यू ५२०१ मध्ये १५ पोत्यांमध्ये ७५० किलो कमी प्रतीचा गूळ व दुसऱ्या मालवाहू गाडी क्र. एमएच ३२, क्यु ५४२८ मध्ये ३० पोत्यांमध्ये १५०० किलो कमी प्रतीचा गूळ आढळून आला. हा गूळ गव्हा, कोल्ही व गणेशपूर शिवारातील पारधी बेड्यांवर मोहा दारू निर्मितीकरिता नेला जात होता. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही वाहनांवर कारवाई करून वाहनांसह ८ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. अंकेलाल उर्फ बंटी शरबत राऊत (५२) रा. गव्हा (कोल्ही) तह. हिंगणघाट, विक्रम महाजन शेंडे (५०) रा. संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, डी.बी. पथकाचे अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, आशिष गेडाम, वैभव चरडे, चालक गजानन दरणे यांनी केली.

Web Title: Washout campaign of Pulgaon police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.