Wardha Blast; सीमावर्ती गावांच्या पुनर्वसनाचा विषय थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 02:54 PM2018-11-20T14:54:28+5:302018-11-20T14:55:11+5:30

मंगळवारी सकाळी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात सहा जणांना प्राण गमवावे लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीएडी कॅम्प परिसराच्या शेजारी असलेल्या गावांचे पुनर्वसन गरजेचे असून तशी मागणीही आहे.

Wardha Blast; The topic of rehabilitation of border villages is in the cold storage | Wardha Blast; सीमावर्ती गावांच्या पुनर्वसनाचा विषय थंडबस्त्यात

Wardha Blast; सीमावर्ती गावांच्या पुनर्वसनाचा विषय थंडबस्त्यात

Next
ठळक मुद्दे३१ मे २०१६ च्या दुर्दैवी घटनेनंतर झाली होती मागणी

महेश सायखेडे
वर्धा: पुलगाव येथील दारूगोळा भंडाराच्या कार्यक्षेत्रात डेल्टा सब डेपो मध्ये ३० मे २०१६ च्या मध्यरात्री झालेल्या स्फोटानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर सीएडी कॅम्प परिसराला लागून असलेल्या काही गावांच्या पुनर्वसनाची मागणी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून रेटण्यात आली होती. परंतु, अद्यापही हा विषय मार्गी लागलेला नाही. सन २०१६ च्या त्या घटनेच्या दोन वर्ष लोटूनही जखमा ताज्या असताना मंगळवारी सकाळी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात सहा जणांना प्राण गमवावे लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीएडी कॅम्प परिसराच्या शेजारी असलेल्या गावांचे पुनर्वसन गरजेचे असून तशी मागणीही आहे.
देवळी तालुक्यातील आगरगाव, पिपरी (ख.), येसगाव, मुरदगाव व नागझरी या गावातील नागरिकांनी सुरक्षेच्या दुष्टीने आमचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे रेटली होती. पुलगावयेथील दारूगोळा भंडार प्रशासन त्यांच्या हद्दीत याच गावांच्या शेजारी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करीत असल्याने ही मागणी मे २०१६ मध्ये करण्यात आली होती. परंतु, आजपर्यंत या मागणीवर पाहिजे तसा विचार होऊन कुठलीही प्रक्रिया न झाल्याने ही मागणी थंडबस्त्यात पडली आहे. विशेष म्हणजे त्या वेळी झालेल्या भीषण स्फोटात याच गावांमधील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

१९ जणांचे बलिदान
सन २०१६ मध्ये झालेल्या स्फोटात आगीवर नियंत्रण मिळविताना कर्नल आर. एस. पवार, सुरक्षा अधिकारी मेजर मनोज कुमार, नायक रणसिंग, शिपाई रामचंदर, सतीश सत्यप्रकाश या सैनिकांसह अग्निशमन दलाचे बाळू पाखरे, लिलाधर चोपडे, अमित दांडेकर, अमोल एसनकर, अमित पुनिया, अरर्विंदसिंग, डी. के. यादव. डी. पी. मेश्राम, कृष्णकुमार, कुलदीपसिंग, नवज्योतसिंग, प्रमोद मेश्राम, एस. जी. बाळस्कर यांनी वीर मरण आले. शिवाय १९ जण या घटनेत गंभीर जखमी झाले होते. उल्लेखनीय म्हणजे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात काय पुढे आले या बाबत मोठी गुप्तता बाळगण्यात आली होती.

स्फोटक विनाशक स्थळ बदलले
पूर्वी ज्या ठिकाणी स्फोटके निकामी केली जात ते ठिकाण आता पुलगावच्या दारूगोळा भंडाराने बदलविल्याची चर्चा आहे. सदर स्थळ पुनर्वसनाच्या मागणीनंतर बदलविण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवाय त्याबाबत अतिशय गुप्तता बाळगली जाते. सध्या केळापूर ते सोनेगाव शिवाराच्या दरम्यान सीएडी कॅम्पच्या कार्यक्षेत्रात स्फोटक विनाशक स्थळ तयार केले आहे.

पुलगावच्या दारूगोळा भंडाराच्या सीमावर्ती परिसरातील गावांच्या पुनर्वसनाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, वर्धा.

Web Title: Wardha Blast; The topic of rehabilitation of border villages is in the cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.