दोन ट्रकची धडक; वाहक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:14 PM2019-04-25T22:14:15+5:302019-04-25T22:14:44+5:30

येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या सुगुणा फुडस्जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजता झाल्याने यात दोन्ही ट्रकच्या केबिनचा चुराडा होऊन ट्रकचा वाहक गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Two trucks hit; Carrier seriously injured | दोन ट्रकची धडक; वाहक गंभीर जखमी

दोन ट्रकची धडक; वाहक गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील घटना : सेवाग्राम येथे उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या सुगुणा फुडस्जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजता झाल्याने यात दोन्ही ट्रकच्या केबिनचा चुराडा होऊन ट्रकचा वाहक गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गाने हैद्राबादकडून नागपुरकडे जाणाऱ्या टि.एन. ३० बीएक्स. ६५०८ क्रमांकाच्या ट्रकला चुकीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या आर.जे.११ जेबी ११९४ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. समोरासमोर झालेल्या या धडकेत दोन्ही ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला असून चुकीच्या दिशेने येणाºया ट्रकचा वाहक प्रदिपकुमार रामसिंग सिकरवार रा. गलेय्या, जि. मुर्रेना हा गंभीर जखमी झाला. तो केबिनमध्ये फसल्याने नागरिकांनी लागलीच धाव घेत त्याला बाहेर काढले. हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले.
दोन्ही अपघातग्रस्त ट्रक महामार्गावरच असल्याने वाहतुकींचा खोळंबा झाला होता. त्यामुळे महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने दोन्ही ट्रक बाजुला करुन वाहतूक सुरळीत केली. याकरिता जाम महामार्गाचे सहायक पोलीस निरिक्षक भरत कºहाडे, चंदू बन्सोड, नागेश तिवारी, बंडू डडमल, पंकज वैद्य आदी यांनी परिश्रम घेतले. या अपघाताची हिंगणघाट पोलिसांनी नोंद घेतली असून पोलीस अधिकारी महादेव महाजन व बजरंग कुंवर पुढील तपास करीत आहे.
अपघात टाळण्याकरिता उपाययोजनेची गरज
वणा नदी पलीकडच्या या राष्ट्रीय महामार्गावर काही लहान मोठे उद्योग आहेत. हिंगणघाटकडून सुगुणा फुडस् तसेच वणी मार्गावरील लहान मार्गाने अल्लीपूरकडे जाण्यासाठी अर्धा किमी पुढे जाऊन परत मागे यावे लागते. त्यामुळे येथे बरेचदा वाहनचालकांचा गोधळ उडत असल्याने बरेचदा चुकीच्या मार्गाने वाहने धावतात. अशा स्थितीत आपल्या मार्गाने जाणाऱ्या वाहनावर चुकीच्या मार्गाने जाणारे वाहन धडकून अपघात होतो. येथील अपघात नेहमीचेच झाल्याने सुगुणा कंपनीजवळ चौकाची निर्मिती करुन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Two trucks hit; Carrier seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात