चिमुकल्यांनी केले दुष्काळाशी दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:09 AM2018-05-25T00:09:42+5:302018-05-25T00:09:42+5:30

कारंजा तालुक्यातील भिवापूर हे गाव दुष्काळाचे चटके सोसत असतांना तिथल्या आठ ते दहा चिमुकल्या पोरांनी हातात कुदळ, फावडे घेऊन काम सुरू केले. हाताला फोड आली... लोक हसली... वेड्यात काढलं... पण लहान हातांनी जिद्दीने जे काम केलं ते गावातील मोठी माणस करू शकली नाही.....!

Two hands with a dilemma done by the little girl | चिमुकल्यांनी केले दुष्काळाशी दोन हात

चिमुकल्यांनी केले दुष्काळाशी दोन हात

googlenewsNext
ठळक मुद्देगायमुख येथे अनेक कामे, खडका गावांत रात्री झाला श्रमदानाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कारंजा तालुक्यातील भिवापूर हे गाव दुष्काळाचे चटके सोसत असतांना तिथल्या आठ ते दहा चिमुकल्या पोरांनी हातात कुदळ, फावडे घेऊन काम सुरू केले. हाताला फोड आली... लोक हसली... वेड्यात काढलं... पण लहान हातांनी जिद्दीने जे काम केलं ते गावातील मोठी माणस करू शकली नाही.....!
या गावात जिव्हाळाच्या चमूने वर्धेवरून ५० कीलोमिटर दूरवर असलेल्या भिवापूर या गावात श्रमदानासाठी गेले. येथे गेल्यावर माहिती झाले की गावातील एक विशाल घाडगे नावाच्या तरुणाने गावातून चिमुकल्यांच्या मदतीने श्रमदान केले. येथे काम करणाऱ्या बालकांशी चर्चा केल्यावर माहिती झाले की हे सगळ ते कुणाच्या प्रशंसेसाठी किंवा बक्षीसासाठी करीत नसून निस्वार्थ भावनेने गावाच्या जलसमृद्धिसाठी करीत असल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्या कामात आपलाही वाटा असावा असे म्हणत जिव्हाळा या सामाजिक टनेने आपला सहभाग नोंदविला.
उद्याच्या भारताच भविष्य असणाऱ्या जबाबदार बालकांच्या या समाज व निसर्गपयोगी कार्याला प्रोत्साहन देवून त्यात आपला वाटा उचलन्यासाठी जिव्हाळा चमूने गावात जावून श्रमदान केले. त्यांनी भिवापूर येथे श्रमदानाच्या या उपक्रमासाठी अतुल पाळेकर, प्रशांत देशमुख, प्रशांत भोसले, किशोर वागदरकर, सुमित हिवसे, नीलेश सांगोले, तुषार पांडे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पावसाच्या स्वागताची तयारी
सेलु - पाणी फाऊंडेश अंतर्गत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेमध्ये सहभागी गायमुख गावाने पावसाच्या स्वागताची पूर्ण तयारी केली. स्पर्धा सुरु झाल्यापासून गावाने स्पधेर्ची कामे सुरु केली, स्पर्धे दरम्यान गावाने ४२ शोषखड्डे, करंज, शेवगा व इतर १५०० झाडांची रोपवाटिका, जल बचतीचे कामे, गावाला गावाचा वाटर बजेट सादर, आगपेटीमुक्त शिवार व माती परीक्षणाचे कामे केली. तर श्रमदानातून पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याकरिता अनेक कामे केली आहेत. गावाने या कामामधून वार्षिक अंदाजे १ कोटी ७५ लाख 50 हजार लिटर पाणी जमिनीत साठवण्याची क्षमता या गावात श्रमदानातून निर्माण करण्यात आली आहे. या प्रकारे गावाने राज्यात एक वेगळ स्थान निर्माण केल आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी गावातील सर्व लोकांनी पावसाला परंपरेनुसार आमंत्रित करण्यासाठी नाविन्य पूर्ण उपक्रम म्हणून श्रमदानातून तयार केलेल्या वनतळ्यावर धोंडी काढून पावसाला निमंत्रण दिले. धोंडी सुरु असताना गाव धोंडीला साद घालत होते. ‘धोंडी धोंडी पाणी दे, धान कोंडा पिकू दे, धोंडी धोंडी पाणी दे, धान कोंडा पिकू दे’ म्हणत गावकºयांनी पावसाचे आवाहन केले.
वॉटर कप स्पर्धेने खडका गाव केले एकसंघ
सेलू - तालुक्यातील खडका या गाव पाणीदार करण्याकरिता गावातील स्त्री, पुरूष, युवक, युवतींनी रामजी नागतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाला खोलीकरण, कंटूर बडींग, शेततळे, शोषखड्डे, रोपवाटीका ही कामे केली. २२ मे रोजी रात्री १२.३० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव यांची उपस्थित होती. याप्रसंगी पाणी फाऊंडेशनचे समन्वयक अमित दळवी, सहाय्यक प्रवीण राठोड, रामुजी नागतोडे, पंचायत समिती सदस्य प्रणिता भुसारी, सरपंच विवेक भोयर, प्रदीप भुसारी उपस्थित होते. तसेच गावकरी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सुधाकर मेहरे, प्रल्हाद गिरीपुंजे, गणपत मेटकर, भक्तराज अलोणे, निळकंठ राऊत, मोरेश्वर तेलरांधे उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विवेक भोयर यांनी मानले.

Web Title: Two hands with a dilemma done by the little girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.