ट्रकचालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:46 PM2019-04-13T23:46:32+5:302019-04-13T23:46:59+5:30

रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून वाहनाच्या कॅबीनमध्ये विश्राती घेत असलेल्या ट्रक चालकावर अज्ञात व्यक्तींनी चाकू हल्ला केला. यात ट्रकचालक रमेशकुमार नरसिंग यादव (३५) रा. रामभैरूली महाराज गंज उत्तरप्रदेश याचा मृत्यू झाला.

Truck driver murdered | ट्रकचालकाची हत्या

ट्रकचालकाची हत्या

Next
ठळक मुद्देधोत्रा शिवारातील घटना : मृताच्या शरीरावर चार गंभीर जखमा

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून वाहनाच्या कॅबीनमध्ये विश्राती घेत असलेल्या ट्रक चालकावर अज्ञात व्यक्तींनी चाकू हल्ला केला. यात ट्रकचालक रमेशकुमार नरसिंग यादव (३५) रा. रामभैरूली महाराज गंज उत्तरप्रदेश याचा मृत्यू झाला. ही घटना नजीकच्या धोत्रा शिवारात घडली असून या प्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मृतकाच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या चार जखमा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेशकुमार यादव यांने त्याच्या ताब्यातील ट्रक धोत्रा शिवारातील गोल्हर यांच्या ढाब्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा केला होता. झोपेची डुलकी येत असल्याने तेथेच वाहन उभे करून तो ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपी गेला. दरम्यान रात्री काही अज्ञात व्यक्तींनी तेथे येत रमेशकुमार यादव याला चाकूने मारहाण केली. रमेशने केलेल्या आरडा-ओरडमुळे बळवंतसिंग सोळंकी हे जागे झाले. त्यांनी तातडीने आपल्या ट्रकचे लाईट सुरू केले.
दरम्यान आरोपींनी घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. ट्रकचालक रमेशकुमार याच्या पाठीवर, पोटावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार प्रविण डांगे, संजय रिठे, दिनेश बागड करीत आहेत.

आरोपींचा ट्रक चालकाला लुटण्याचा उद्देश?
रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून विश्राती घेत असलेल्या ट्रक चालकावर हल्ला करणारे ट्रक चालकाजवळील रोख व मौल्यवान साहित्य लुटण्याच्याच उद्देशाने आले असावे, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु, या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या गळाला लागल्यानंतरच वास्तव काय? याचा उलगडा होणार आहे.

Web Title: Truck driver murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून