धुळवडीच्या दिवशी अति वेग ठरला तरुणासाठी काळ; उड्डाणपुलावरून पडून मृत्यू

By चैतन्य जोशी | Published: March 8, 2023 04:58 PM2023-03-08T16:58:18+5:302023-03-08T17:01:21+5:30

सेवाग्राम पोलिसांनी घेतली नोंद

speedy bike hits the safety wall, Youth dies after falling from flyover at sewagram route | धुळवडीच्या दिवशी अति वेग ठरला तरुणासाठी काळ; उड्डाणपुलावरून पडून मृत्यू

धुळवडीच्या दिवशी अति वेग ठरला तरुणासाठी काळ; उड्डाणपुलावरून पडून मृत्यू

googlenewsNext

वर्धा : सेवाग्रामकडून वर्ध्याकडे दुचाकीने अति वेगात येणाऱ्या तरुणावर काळाने झडप घातली. दुचाकी थेट कठड्याला भिडून तरुणाचा पुलाखाली पडून जागीच मृत्यू झाला. हा अपघात ७ मार्च राेजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सेवाग्रामकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर झाला. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी अपघातस्थळी जात पंचनामा करुन नोंद घेतली. प्रतीक उराडे (३१) रा. आदिवासी कॉलनी, वर्धा असे मृतकाचे नाव आहे.

प्रतीक उराडे हा त्याच्या दुचाकीने सेवाग्राम येथे कामानिमित्त गेला होता. काम आटोपून तो दुचाकीने परत येत असतानाच सेवाग्राम उड्डाणपुलावर वेगात असलेल्या दुचाकीवरून त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट पुलाच्या कठड्यावर जाऊन भिडली. जोरदार धडकेत प्रतीक पुलाखाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

परिसरातील नागरिकांना अपघात झाल्याचे कळताच नागरिकांनी पुलावर धाव घेतली. तसेच सेवाग्राम पोलिसांनी अपघातस्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह सेवाग्राम येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. प्रतीक हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने परिवारावर शोककळा पसरली आहे.

Web Title: speedy bike hits the safety wall, Youth dies after falling from flyover at sewagram route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.